Share

तेरणा कारखाना; शिष्टमंडळ केंद्रिय मंत्र्यांना भेटले, अनामत रकमेतून पीएफ भरण्याचा पर्याय

Published On: 

उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील तेरणा साखर कारखाना सुरू करण्यासाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या रकमेची अट आहे. यावर तोडगा काढण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री संतोष गंगावार यांची भेट घेतली.

दीड तासांची बैठक झाल्यानंतर कारखाना भाडेतत्वावर देताना अनामत रकमेतून भविष्य निर्वाह निधीची रक्कम देण्याची अट घालण्याचा निर्णय घेण्यात आला. तसा प्रस्ताव केंद्रीय रोजगार व भविष्य निर्वाह निधी मंत्री संतोष गंगावार यांच्या कार्यालयाकडे दिला असून, भविष्य निर्वाह निधीचे केंद्रीय आयुक्त सुनिल भारतवाल यांच्या कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले की, तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरु व्हावा, ही महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची इच्छा आहे. त्यादृष्टीने अडचणींवर मात करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित पाठपुरावा करत आहोत. या कारखान्याच्या ३५ हजार शेतकरी सभासदांच्या हितासाठी तसेच त्यावर आधारित दीड हजार कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी हा कारखाना सुरु होणे ही काळाची गरज आहे.

त्यातच यावेळी दमदार पाऊस झाल्याने ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. हक्काचा कारखाना सुरु झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. त्यानुसार मंत्री गंगावार यांच्यासमवेत शिष्टमंडळाची बैठक श्रमशक्ती कार्यालयात पार पडली. बैठकीत मंत्र्यांना कारखान्याचा विषय समजावून सांगितल्यानंतर अडचणीतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. भविष्य निर्वाह निधी विभागाचे केंद्रीय आयुक्त सुनिल भारतवाल यांना याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याच्या सुचना दिल्या.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!