Share

‘वाझे प्रकरणाचं नागपूर कनेक्शन,’त्या’ व्यक्तीने दिले होते राम मंदिरासाठी १५ कोटी’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे तीव्र पडसाद अधिवेशनात उमटले आहे. मनसुख हिरेन यांची पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी हत्या केल्याचा आरोप भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकच शाब्दिक चकमक उडाली. आज काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी राज्यसभेत मोहन डेलकर यांची आत्महत्या आणि मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे.

काँग्रेस खासदार कुमार केतकर यांनी राज्यसभेत याबाबत मुद्दा उपस्थित केला, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिन स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती, मात्र हे जिलेटिन कुठून आले आणि कोणत्या हेतूने ते देण्यात आलं होतं, याबाबत चौकशी का केली जात नाही? असा प्रश्न केतकरांनी राज्यसभेत उपस्थित केला.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिन स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती, त्या गाडी मालकाचा मृतदेह सापडला. या प्रकरणाचा तपास NIA करत आहे. मात्र या प्रकरणात ज्या नागपूरच्या कंपनीत हे जिलेटिन तयार झाले, ज्यांनी याचा पुरवठा केला त्यांची चौकशी का केली जात नाही, या जिलेटिन बनवणाऱ्या कंपनीच्या व्यक्तीने विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून अयोध्येतील राम मंदिरासाठी १५ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. त्यामुळे जिलेटिन कोणी पुरवलं? कोणत्या हेतूने हे जिलेटिन दिलं होतं? याचीही चौकशी होणं गरजेचे आहे अशी मागणी कुमार केतकर यांनी राज्यसभेत केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!