🕒 1 min read
मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यात रविवारी तब्बल 16620 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे, एकूण 126231 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक भागात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तर, काही ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवरून उद्योजक आनंद महिंद्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे एक मागणी केली आहे.कोरोना रूग्णांची संख्या पाहता महाराष्ट्रात सरसकट सर्वांना लसीकरणाला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आनंद महिंद्रा यांनी केली आहे.
Over half the new daily cases are in Maharashtra.The state is the nerve-centre of the country’s economic activity & more lockdowns will be debilitating. Maharashtra needs emergency permission to vaccinate EVERY willing person. No shortage of vaccines. @PMOIndia @drharshvardhan https://t.co/AemBFcrAd7
— anand mahindra (@anandmahindra) March 15, 2021
त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. रोज सापडणाऱ्या नव्या रुग्णांपैकी अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्र राज्य हे देशाच्या आर्थिक क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहे. आणखीन लॉकडाउन राज्याला आर्थिक दुष्ट्या कमकुवत करणारे ठरतील, असं आनंद महिंद्रा म्हणाले. ज्यांना ज्यांना लस घेण्याची इच्छा आहे अशा सर्वांना लसीकरणाची तातडीची परवानगी देण्याची गरज महाराष्ट्रात आहे. लसींची कमतरता नाहीये, असं महिंद्रांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या
- आज भारत-इंग्लंड तिसरा टी-20 सामना ; विराटसेनेला मालिकेत आघाडी घेण्याची संधी
- साष्टपिंपळगावच्या आंदोलकांना अटक, संतप्त महिलांचा पोलीस ठाण्यात ठिय्या
- …म्हणून उच्चशिक्षित तरुणाने नाकारले भाजपने दिलेले तिकीट
- कॉंग्रेसला तगडा झटका देण्याच्या तयारीत पवार? मातब्बर नेता राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार?
- ‘ऑस्कर २०२१’च्या नामांकनाची घोषणा; प्रियंका चोप्रा आणि निक जोनसने केली घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
