🕒 1 min read
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या आता काही महिन्यांवर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष आपल्या तयारीला लागले असून काही दिवसांपूर्वीच भाजपाने नियोजन सुरु केले असून भाजप पाठोपाठ काँग्रेसने देखील आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नुकतीच अनुभवी नेते व विधान परिषद सदस्य भाई जगताप यांची वर्णी लागली आहे. आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून जगताप यांच्यापुढे मुंबईत पक्ष संघटना मजबूत करण्याचे मोठे आवाहन असणार आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील निवडणुकांच्या तयारीला लागले असून मुंबई महानगरपालिकेमध्ये बहुभाषिक मुंबईकरांच्या अस्मितेचा प्रश्न असलेल्या त्यांच्या भाषेच्या मुद्याला हात घालत येथे मतदारांना आकर्षित करणाऱ्या प्रचार मोहिमा मुंबईत प्रभावी ठरतात. यासाठी आता आश्चर्याची बाब म्हणजे एरवी मराठीचा आग्रह धरणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही घाटकोपर पूर्व विभागात नवीन सदस्यनोंदणीसाठी गुजराती भाषेत फ्लेक्स लावले आहेत.
घाटकोपर पूर्व हा गुजरातीबहुल मतदार असलेला परिसर आहे. त्यामुळं मनसेनं घाटकोपर पूर्वच्या चौकाचौकात गुजराती भाषेत सदस्यनोंदणीसाठीचे फ्लेक्स लावले मुंबईमधल्या काही विभागांत गुजरातीभाषिक मतदारांचा कौल निर्णायक आहे. त्यामुळं एकीकडे शिवसेना गुजरातीभाषिक मतदाराना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करताना दिसत आहे. आणि आता तर मनसेनंही चक्क गुजराती भाषेत सदस्यनोंदणीसाठी फ्लेक्स लावले आहेत. त्यामुळे आता अगोदर आपला झेंडा भगवा करून हिंदुत्वाकडे झुकलेली मनसे आता मराठीचा आग्रह सोडून गुजरातीभाषिक मतदाराना आकर्षित करण्यात कितपत यशस्वी होते हे आगामी काळात दिसून येईल.
महत्वाच्या बातम्या
- तिसऱ्या टी-२० सामन्यात सुर्यकुमारसाठी कोहली बलीदान करेल का?
- आज भारत-इंग्लंड तिसरा टी-20 सामना ; नव्या खेळाडूंवर सर्वांच्या नजरा
- आज इंग्लंडविरुद्ध तिसरी लढत रंगणार ; हिटमॅन रोहित शर्माचं पुनरागमन
- ‘एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ कर्नाटकचे मुख्यमंत्री व देशाच्या पंतप्रधानांकडे घेऊन जाच’
- ‘मोठे शौर्य गाजविले या भ्रमात त्या कानडी संघटनांनी राहू नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
