Share

इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका रद्द करा अन्यथा आत्महत्या करेल ; गुजरातमधील एका व्यक्तीची पोलिसांना धमकी

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लड संघादरम्यान पाच टी-२० सामन्याची मालिका अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी या मैदानावर होत आहे. सद्यस्थितीत आतापर्यंत झालेल्या सामन्यात प्रेक्षकांना ५० टक्के क्षमतेने प्रवेश दिला जात आहे. मात्र कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव पाहता उर्वरित सामन्यात प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. सोमवारी संध्याकाळी बीसीसीआयने या संदर्भात टि्वट करुन एक पत्रक जाहीर केले आहे. याचदरम्यान, भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेली टी-20 मालिका रद्द न केल्यास आत्महत्या करेल, अशी धमकी गुजरातमधील एका अज्ञात व्यक्तीने चांदखेडा पोलिसांना  दिली आहे.

याप्रकरणी अहमदाबादच्या चांदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून पंकज पटेल असे त्याचे नाव आहे. तो गुजरातच्या गांधीनगरमधील रहिवाशी असल्याचे कळत आहे. त्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक के.व्ही. पटेल यांना 12 मार्च रोजी ही धमकी दिली होती.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रेकॉर्डिंगनुसार, पंकजने पोलिस निरीक्षकास कोविड 19 मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात आहे की नाही, असा प्रश्न विचारला आहे. तसेच या सामन्यात अंदाजे 75 हजार प्रेक्षक उपस्थिती दर्शवतात. सध्या कोरोनाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. महत्वाचे म्हणजे, भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या टी-20 मालिकेमुळे रुग्णांच्या संख्येत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेली टी-20 मालिका रद्द न केल्यास आत्महत्या करेल, अशी धमकी त्याने पोलीस निरीक्षकास दिली आहे. याप्रकरणी पंकज विरोधात भारतीय दंड संहिता कलम 505 (2), 507, 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!