🕒 1 min read
मुंबई: सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा वाढणार अशी लक्षणे दिसत आहेत. कारण दोन दिवसांपूर्वी बेळगाव येथे कन्नड रक्षण वेदिके संघटनेने शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर हल्ला केला होता. तसेच गाडीवरील भगवा ध्वज काढून टाकत, भगव्या फलकास काळे फासण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर प्रत्युत्तरात कोल्हापुरात शिवसेनेकडून कर्नाटकच्या बसेसना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे सीमाभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, बेळगाव सीमाभागात कर्नाटक सरकार आणि स्थानिक पोलिसांची गुंडगिरी सुरूच सीमावादावरून कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारने एकमेकांवर कुरघोडी करत असतानाचा तिथल्या पोलिसांनीही माणुसकीला लाजवेल असे कृत्य केले आहे. मराठी भाषिक तरुणांनी व्हॉट्सअॅपवर स्टेट्स ठेवले म्हणून अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कानडी पोलिसांकडून सातत्याने मराठी भाषिकांवर अमानुष अत्याचार होत असल्याचा आरोप स्थानिक मराठी भाषिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अजून किती दिवस कानडी जुलूमशाही सुरू राहणार? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे. यावरून आजच्या सामना अग्रलेखातून केंद्र सरकार आणि कर्नाटक मधील भाजप सरकारवर निशाणा साधला असून या सर्व प्रकरणी महाराष्ट्राने संयम सोडला तर कानडी राज्यास जबरदस्त अशी आर्थिक व इतर किंमत मोजावी लागेल असा सज्जड इशारा यावेळी देण्यात आला आहे.
‘कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने बेळगावसह सीमा भागातील मराठी माणसांवर हल्ले सुरू केले आहेत. मराठी भाषिकांच्या दुकानांवरील मराठी पाटय़ा उचकटवून टाकणे, मराठी ‘नंबरप्लेट’ असलेल्या गाडय़ांवर हल्ले करणे, मराठी तरुणांनी मोबाईलवर मराठी भाषेचे स्टेटस ठेवल्याचा राग म्हणून त्यांना अमानुष मारहाण करणे, ‘मराठी भाषिक वाघ आहेत’ अशा प्रकारच्या स्टेटसवर आक्षेप घेऊन जुलूम करणे हे अमानुष आणि लोकशाहीविरोधी आहे. त्याआधी बेळगाव महापालिकेवरील भगवा ध्वज उतरवून तेथे त्या कन्नड रक्षण वेदिकेवाल्यांनी लाल-पिवळा ध्वज लावला. त्यावरून मराठी तरुण आणि कानडी पोलिसांत झटापट झाली, त्यात गुन्हेगार ठरवले गेले ते मराठी तरुण. हे गेल्या सत्तरेक वर्षांपासून सुरूच आहे. आताही दोन दिवसांपूर्वी बेळगावात शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या गाडीवर हल्ला करून फार मोठे शौर्य गाजविले या भ्रमात त्या कानडी संघटनांनी राहू नये.
या सर्व प्रकरणी महाराष्ट्राने संयम सोडला तर कानडी राज्यास जबरदस्त अशी आर्थिक व इतर किंमत मोजावी लागेल; पण देश एक आहे असे आम्ही मानतो. देशांतर्गत भाषिक वाद म्हणजे मराठी किंवा कानडी भाषिकांचा झगडा नाही. दोन भाषिकांनी या प्रश्नी समोरासमोर येऊन एकमेकांची डोकी फोडावीत, एकमेकांच्या मालमत्तांचे नुकसान करावे असे आम्हाला अजिबात वाटत नाही. बेळगावसह संपूर्ण सीमा भागातील मराठी माणूस, मराठी भाषा व संस्कृतीचे रक्षण करणे हे महाराष्ट्राचे कर्तव्यच ठरते. असा इशारा आजच्या सामना अग्रलेखातून कानडी संघटनांना देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- तिसऱ्या टी-२० सामन्यात सुर्यकुमारसाठी कोहली बलीदान करेल का?
- आज भारत-इंग्लंड तिसरा टी-20 सामना ; नव्या खेळाडूंवर सर्वांच्या नजरा
- आज इंग्लंडविरुद्ध तिसरी लढत रंगणार ; हिटमॅन रोहित शर्माचं पुनरागमन
- ‘एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ कर्नाटकचे मुख्यमंत्री व देशाच्या पंतप्रधानांकडे घेऊन जाच’
- ‘मोठे शौर्य गाजविले या भ्रमात त्या कानडी संघटनांनी राहू नये’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
