Share

आलियाच्या वाढदिवसात व्यस्त मीडीयाला हॉकी विश्वचषकाचा विसर: मेजर ध्यानंचदच्या मुलाची खंत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : १५ मार्च रोजी सर्व भारतीय मीडीया आलिया भट्टचा वाढदिवस साजरा करत होती. मात्र याच दिवशी भारताने ४६ वर्षापुर्वी जिंकलेला एकमेव हॉकी विश्वचषकाची कोणाला आठवण नाही राहिली. एकीकडे आम्ही राष्ट्रवादाची भाषा करतो. पण त्याचवेळी संपुर्ण देशाला आंनदाचा आणि गौरवाचा क्षण देणाऱ्या विश्वविजयाला मात्र विसरतो, अशी खंत मेजर ध्यानचंद यांचे पुत्र आणि या संघाचे खेळाडू अशोक कुमार यांनी व्यक्त केली.

खेळाच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध झालेली किंवा भविष्यात होणारा प्रत्येक सामना हा भारत-पाकिस्तान क्रीडा रसिकासाठी धर्मयुद्धाप्रमाणे असतो. याच पाकिस्तानविरुध्द १९७५ च्या विश्वचषकातील १५ मार्च रोजी झालेल्या अंतिम सामन्यात मेजर ध्यानचंद यांचे पुत्र आणि माजी हॉकी खेळाडू अशोक कुमार यांनी विजयी गोल नोंदवीला होता. मात्र या विश्वविजया बद्दल कोणालाही आठवण नसल्याने अशोक कुमार यांनी नाराजी व्यक्त केली.

भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला २-१ अशा गोलफरकाने लोळवून भारतीय हॉकी संघाने मलेशियाची राजधानी क्वालालम्पूर येथे विश्वविजयी पताका फडकाविली होती. १५ मार्च १९७५ चा तो दिवस, या ऐतिहासिक घटनेला १५ मार्च २०२१ रोजी ४६ वर्षे झाली. हॉकीचा एकमेव विश्वचषक जिंकलेला तो दिवस दुर्दैवाने कुणाच्याही स्मरणात नाही. चाहतेदेखील त्या जेतेपदाच्या नायकांना विसरले आहेत.

विश्वविजेत्या संघाचे सदस्य अशोक दिवाण यांचे मत

‘भारताचा हा पहिलाच विश्वचषक होता. आजपर्यंत आम्ही दुसऱ्या जेतेपदाची प्रतीक्षा करीत आहोत. १५ मार्चला दरवर्षी आम्ही त्या संघातील जीवित सदस्य, तसेच हॉकी समुदायातील लोक एकमेकांचे अभिनंदन करतो. अन्य कोणाला त्या ऐतिहासिक क्षणांचे स्मरण होत नसावे. काही देणेघेणे नाही. असेच होत राहिल्यास भावी पिढीला काही कळणार नाही.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!