🕒 1 min read
नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर ड्रग्जचे प्रकरण समोर आले. यात सिनेसृष्टीतील अनेक मोठी नावे घेतली गेली. रिया चक्रवर्ती ही त्यापैकीच एक. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणातही रियाला कोर्टात जावे लागले होते. पण तिला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, रियाच्या अडचणी अद्याप संपल्याचे दिसत नाहीयेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात अंमली पदार्थ विरोधी पथकाने रियाच्या जामिनाविरोधात सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर १८ मार्चला सुनावणी होणार आहे.
Supreme Court's CJI bench, to hear on March 18, an appeal filed by the Narcotics Control Bureau (NCB) challenging the order of Bombay High Court granting bail to actor Rhea Chakraborty in an alleged drug case.
— ANI (@ANI) March 15, 2021
फेब्रुवारीत एनसीबीने मुंबई विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल केली होती. यामध्ये ३३ आरोपींच्या नावांचा समावेश आहे. त्यामध्ये रियाचे देखील नाव आहे. तसेच, तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचं देखील यामध्ये नाव आहे. तब्बल ११ हजार ७०० पानांच्या या चार्जशीटमध्ये जप्त करण्यात आलेलं ड्रग्ज, गोळा करण्यात आलेले पुरावे, आत्तापर्यंत झालेला तपास या सर्व मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. चार्जशीटमधील एकूण आरोपींपैकी ८ जण अजूनही न्यायालयीन कोठडीत आहेत.
यातील रिया, शौविक चक्रवर्ती आणि इतर आरोपी जामिनावर बाहेर आहेत. रिया, तिचा भाऊ शौविक, सुशांतच्या कर्मचारी वर्गापैकी काही आणि बॉलिवुडमधील इतर काही व्यक्तींमध्ये झालेल्या व्हॉट्सअप चॅटच्या आधारावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं तपास सुरू केला होता. या चॅटमध्ये असलेल्या ड्रग्जच्या उल्लेखांमुळे बॉलिवुडमधील अनेक मोठमोठी नावं अडचणीत देखील आली होती.
महत्वाच्या बातम्या
- २ हजारांची नोटही बाद होते की काय? २ वर्षांपासून २ हजारांच्या नोटांची छपाई बंदच
- लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडले, सरकारने त्यावर मीठ चोळले!
- ‘बेळगाव प्रश्नी काही लोकांचा अनावश्यक हस्तक्षेप’, कुमारस्वामींनी शिवसेनेला डिवचले
- ‘केबीसी’च्या नावाखाली एक लाखाची फसवणूक
- आमदारांना लॅपटॉप, गरीब विद्यार्थ्यांना का नाही?, भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
