Share

२ हजारांची नोटही बाद होते की काय? २ वर्षांपासून २ हजारांच्या नोटांची छपाई बंदच

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : ८ नोव्हेंबर २०१६ ची ती रात्र कोणीच विसरू शकणार नाही. ८ तारखेला ८ वाजता पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदी आणत ५०० च्या जुन्या आणि १ हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर काही दिवसांतच ५०० च्या नव्या नोटा आणि प्रथमच २००० ची नोट बाजारात आणण्यात आली. आजघडीला बाजारपेठेतील २००० रुपयांची नोट हे मोठे चलन आहे. पण आता नोटबंदीचा परिणाम ठरलेल्या २ हजारांच्या नोटा आता बाजारपेठेतून हद्दपार होणार आहेत की काय अशी भीती निर्माण झाली आहे. कारण, केंद्र सरकारनेच दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २ वर्षांमध्ये २ हजार रुपयांची एकही नोट छापली गेलेली नाही.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर दिले. त्यावेळी ही माहिती समोर आली. आपल्या लेखी उत्तरामध्ये त्यांनी २ हजारांची एकही नोट गेल्या २ वर्षांत छापली नसल्याचे म्हटले आहे. “विशिष्ट किंमतीच्या नोटांची छपाई करण्याचा निर्णय केंद्र सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासोबत सल्लामसलत करून घेत असते. यातून बाजारात नोटांच्या मागणीनुसार योग्य प्रमाणात नोटांचा पुरवठा ठेवता येतो. मात्र, २०१९-२० आणि २०२०-२१ या दोन्ही आर्थिक वर्षांमध्ये २ हजारांची एकही नोट छापली गेलेली नाही”, असं त्यांनी आपल्या उत्तरात म्हटलं आहे.

ठाकूर यांच्या माहितीनुसार, ३० मार्च २०१८ रोजी देशात २ हजार रुपयांच्या ३३६ कोटी २० लाख नोटा होत्या २६ फेब्रुवारी २०२१ मध्ये हाच आकडा २४९ कोटी ९० लाख नोटांपर्यंत खाली आला. त्यामुळे बाजारातून २ हजार रुपयांच्या नोटा कमी होऊ लागल्यामुळे केंद्र सरकारने नोटा न छापण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे पुढील काळात २ हजार रुपयांच्या नोटा छापल्या जाणार की नाही? याविषयी त्यांनी माहिती दिलेली नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!