🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणात सचिन वाझे यांच्या चौकशीनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती लागलेल्या माहितीनंतर अनेक खळबळजनक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकार सावध झाल्याचे दिसत आहे. काहीवेळापूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट झाली आहे.
या बैठकीत शिवसेना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. हे संपूर्ण प्रकरण हाताळण्यात गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख अपयशी ठरले. त्यामुळे त्यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारुन गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असे सरकारमधील काही नेत्याचे म्हणणे आहे.
त्यानंतर आता थोड्याच वेळात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीचे कारण जरी मंत्र्यांची झाडाझडती असल्याचे सांगण्यात येत असले तरी सचिन वाझे प्रकरणात महाविकास आघाडी सरकारचे पाय खोलात अडकल्याने या प्रकरणात डॅमेज कंट्रोल कशाप्रकारे करायचे, याविषयी चर्चा होणार असल्याचे कळते. तर अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यायचा की त्यांनाच कायम ठेवायचं यावर चर्चा होणार आहे.
तर दुसरीकडे गृहमंत्री अनिल देशमुख हे सुशांतसिंग राजपूत, पूजा चव्हाण आणि आता मनसुख हिरेन प्रकरण हाताळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका सरकारमधील काही बड्या नेत्यांनी ठेवला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी गृहमंत्रीपद कोणा बड्या नेत्याकडे देण्याचे विचार करत आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे नावं आघाडीवर आहेत.
महत्वाच्या बातम्या
- वाझे सट्टेवाल्यांकडून खंडणी उकळतो आणि वरुण सरदेसाई त्यातून हिस्सा घेतो – नितेश राणे
- पडळकर फडणवीसांना म्हणाले ‘शेतकऱ्यांचे हृदयसम्राट’; नेटकऱ्यांनी धु-धु धुतले !
- इशान-सूर्याचा मुंबई इंडियन्ससाठी शेवटचा सिझन! वाचा कारण
- …म्हणून आगामी निवडणूकीत कुठल्याही पक्षासोबत युती नाही; मायावतींचा स्वबळाचा नारा
- मराठा आरक्षणासंदर्भात काय होणार? आज महत्वाची सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
