🕒 1 min read
मुंबई : मुंबईत गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली होती. या कारवाईनंतर अखेर सचिन वाझे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
आज भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझे प्रकरणी युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘देशात आयपीएलचं आयोजन देशातील नवोदित खेळाडूंना वाव मिळावं यासाठी करण्यात येतं. मात्र, या आयपीएलवरही सट्टा लावण्यात येत असून वाझेंकडून या सट्टेबाजांना फोन जात होता. या सट्टेबाजी करणाऱ्यांचं लोकेशन व इतर माहिती असल्याचं सांगत छापा पडू द्यायचा नसेल तर मला दीडशे कोटी रुपये द्या,’ अशी मागणी करत असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय.
‘वाझेंनी सट्टेबाजांना पैशासाठी फोन केल्यानंतर वाझेंना एका माणसाचा फोन जातो. तुम्ही सट्टेबाजांकडून एवढे पैसे मागितले. आमचं काय? आम्हाला त्यातला हिस्सा का नाही?, अशी विचारणा या माणसाकडून वाझेंना केली जाते. हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून वरुण सरदेसाई आहेत.’ असा गंभीर आरोप राणेंनी केला आहे.
पुढे त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ‘वाझे आणि सरदेसाई यांच्यातल्या संभाषणाची चौकशी करण्यात यावी, या संभाषणाचा सीडीआर काढण्यात यावा, त्यात काय काय बोलणं झालं याची माहिती घेण्यात यावी,’ असं आहेत. तसेच, ‘सरदेसाई कुणाचा नातेवाईक आहे आणि कुणाच्या आशीर्वादाने हे फोन केला जात होता हे सांगण्याची गरज नाही,’ असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर देखील अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या
- आमदारांना लॅपटॉप, गरीब विद्यार्थ्यांना का नाही?, भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- पडळकर फडणवीसांना म्हणाले ‘शेतकऱ्यांचे हृदयसम्राट’; नेटकऱ्यांनी धु-धु धुतले !
- इशान-सूर्याचा मुंबई इंडियन्ससाठी शेवटचा सिझन! वाचा कारण
- …म्हणून आगामी निवडणूकीत कुठल्याही पक्षासोबत युती नाही; मायावतींचा स्वबळाचा नारा
- मराठा आरक्षणासंदर्भात काय होणार? आज महत्वाची सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
