Share

इतका माज कोठून आला? शिवसैनिकांचा पंपावर धुडगूस, ठाण्यातच पोलिसांना मारहाण

Published On: 

🕒 1 min read

बीड : स्कॉर्पिओत डिझेल भरल्यानंतर पैसे मागितल्याने दोन शिवसैनिकांनी पंपावरील कर्मचाऱ्यासह मॅनेजरला शिवीगाळ करत मारहाण केली. घटनेची माहिती पोलीसांना झाल्यानंतर पोलीसांनी कर्मचाऱ्यास शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणले. यानंतर आरोपींनी शिवाजीनगर ठाण्याच्या कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. या प्रकरणी दोघा जणांविरोधात बीड शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, पोलिसांना शिवीगाळ करतानाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे. इतकेच नव्हे तर पोलिसांनाही धक्काबुक्की करण्याइतपत माज या आरोपींना कोठून आला. त्यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे, या प्रकारचे अनेक प्रश्न सोशल मीडियावरून विचारले जाऊ लागले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याकडे लक्ष देऊन त्यांच्या माजोरड्या शिवसैनिकांना आवर घालावा अशी मागणी जोर धरत आहे. विशेष म्हणजे या घटनेतील आरोपी संदिपान बडगे याची आई बेलखंडी पाटोद्याची सरपंच आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संदीपान दत्तोबा बडगे (रा. बेलखंडी पाटोदा) व अभिषेक असाराम पवळ (रा. संभाजीनगर, बीड) हे दोघे काल चऱ्हाटा फाट्यावर असलेल्या उबाळे यांच्या पेट्रोल पंपावर स्कॉर्पिओ (क्र. एमएच २३ एएक्स ५९३९) यामध्ये आले होते. डिझेल भरल्यानंतर तेथीस कर्मचारी आकाश शिंदे यांनी पैसे मागितले.

यावर पैसे का मागितले म्हणून आकाश शिंदे यास मारहाण केली. त्यामध्ये मध्यस्थी करण्यास गेलेले मॅनेजर अमोल कदम यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. घटनेची माहिती शिवाजीनगर ठाण्याला देण्यात आली. त्यानंतर संदीपान बडगे आणि अभिषेक पवळ यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जालिंदर नाना बनसोडे यांचे गचुरे धरत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून दोन्ही आरोपींविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!