Share

‘भाजपने सुशांतच्या नावावर संपूर्ण निवडणूक लढवली; आता सचिन वाझे प्रकरणी…’

Published On: 

मुंबई : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित करून अटक करावी अशी मागणी भाजप नेत्यांनी करत आक्रमक भूमिका घेतली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील याचे पडसाद उमटले होते. तर, सबळ पुरावे असूनही महाविकास आघाडी सरकार त्यांना पाठीशी घालत आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

आता, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी देखील भाजपने असाच आकांडतांडव केला होता, मात्र सीबीआय चौकशीत पुढे काय समोर आलं ? असा सवाल काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना भाजपला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

‘सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणात भाजपने प्रचंड आरडाओरडा केला. हा तपास केंद्रीय यंत्रणांकडे देखील दिला. परंतु, त्याचा रिपोर्ट अद्याप सर्वसामान्यांसमोर आला नाही. भाजपने सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणावर एक संपूर्ण निवडणूक काढली. त्यामुळे सचिन वाझे प्रकरणात तरी भाजपने मुळापर्यत जावं,’ असा सल्ला देखील भाई जगताप यांनी भाजपला दिला आहे.

पुढे ते म्हणाले, ‘राज्यात जे काही प्रकार घडत आहेत याबाबत वारंवार सरकार अस्थिर करण्यासाठी आकांडतांडव करायचं असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय असो किंवा एनआयए असो त्यांचा जो रिपोर्ट आहे. तो आता समोर आणावा,’ अशी मागणी देखील जगताप यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!