Share

आता ऑल इंडिया टुरिस्ट परमिटसाठी नवी योजना; अवघ्या ‘इतक्या’ दिवसात मिळणार हे परमिट

Published On: 

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये देशातील वाहतुकीसंदर्भात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आता, देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक योजना आणली आहे. ऑल इंडिया टूरिस्ट परमिटची घेण्यासाठीची प्रक्रिया अधिक सुलभ व वेगवान करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आता पाऊल उचलले आहे.

ऑल इंडिया टूरिस्ट परमिट ऑपरेटर्सना ऑनलाईन अर्ज जमा केल्यानंतर 30 दिवसांमध्ये परमिट मिळेल अशी माहिती देण्यात आली आहे. आज केंद्र सरकार द्वारे नवी योजना सुरु करण्यात आली आहे. या नव्या योजनेच्या नियमांनुसार कोणताही पर्यटक वाहन ऑपरेटर ऑनलाईनद्वारे ऑल इंडिया टूरिस्ट ऑथरायजेशन/ परमिटसाठी अर्ज करू शकतो. हे नवे नियम १ एप्रिल २०२१ पासून लागू केले जातील असं देखील यावेळी जाहीर करण्यात आलं आहे.

हा नियम संबंधित कागदपत्र जमा केल्यानंतर आणि फीस भरल्यानंतर जारी केला जाईल. यासाठीची कागदपत्र जमा करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हा नवा नियम ऑल इंडिया टूरिस्ट ऑथरायजेश अँड परमिट रुल्स 2021 रुपात ओळखला जाईल.

३ वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी देखील मिळेल हे परमिट !

परिवहन मंत्रालयानुसार, या स्किममध्ये टूरिस्ट वेहिकल ऑपरेटर्सला वेळेची फ्लेक्सिबिलिटी मिळेल. याअंतर्गत ऑपरेटरला किमान तीन महिन्याचं परमिट मिळेल. तर, अधिकाधिक 3 वर्षांपर्यंत परमिट दिलं जाऊ शकेल. दरम्यान, देशांतर्गत पर्यटनाला चालना मिळावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!