मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी आढळून आली होती. या प्रकरणाचं गूढ अधिक वाढत असून त्या गाडीचे मालक मुनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. याप्रकरणी सचिन वाझे यांना एनआयए ने अटक केली आहे. अटकेपूर्वी तब्बल 13 तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली.
दरम्यान, सचिन वाझे यांनी तब्बल ६३ एन्काउंटर केले आहेत. तर, सचिन वाझेंसह 14 पोलिस कर्मचाऱ्यांना 2004 मध्ये सस्पेंड करण्यात आलं होतं. या सर्वांवर 2002 घाटकोपर ब्लास्टचा आरोपी ख्वाजा यूनिसच्या कस्टोडियल डेथचा आरोप होता. यानंतर, २००७ मध्ये त्याचा बडतर्फीचा कालावधी संपला होता. मात्र, पोलीस विभागावर नाराज होत त्यांनी मुंबई पोलीस मधील सेवेचा राजीनामा दिला होता.
यानंतर, २००८ मध्ये त्यांचा शिवसेनेशी देखील संबंध आला. यानंतर तब्बल १३ वर्षांनी ६ जून २०२० मध्ये सचिन वाझे यांना पुन्हा मुंबई पोलीस दलात रुजू करण्यात आलं. मात्र, महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी असतानाच त्यांना परत रुजू का करून घेतलं ? त्यांना महत्वाच्या जबाबदाऱ्या का दिल्या ? असे सवाल भाजपने केले होते.
दरम्यान, सचिन वाझे यांच्या कोठडी संदर्भात एनआयए कोर्टात सुनावणी सुरु आहे. त्यांना परत रुजू करण्याचे कारण पोलीस विभागाकडून न्यायालयात स्पष्ट करण्यात आलं आहे. कोरोना काळात आपत्ती परिस्थिती उद्भवल्यामुळे पोलीस विभागात मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली होती. यामुळेच, जून मध्ये सचिन वाझे यांना रुजू करण्यात आल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
महत्वाच्या बातम्या
- सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करायची असेल तर करा – नाना पटोले
- ‘या प्रकरणातील सत्य शोधून काढा आणि…’ ; झोमॅटो मारहाण प्रकरणात परिणीती चोप्राची उडी
- …म्हणून अजित पवारांनी फडणवीसांसोबत एकाच मंचावर येणं टाळलं
- ‘महाविकास आघाडीला १७१ आमदारांचा पाठींबा आहे, आम्ही निवडणुकीला घाबरत नाही’
- ईशान किशन जे बोलला ते ऐकून विराट त्याला संघात जागा देण्याचा नक्कीच विचार करेल !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
