Share

गुन्हे शाखे पाठोपाठ स्थानिक गुन्हे शाखेने केली मोक्कातील आरोपीला अटक

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : आठ वर्षांपासून फरार असलेल्या मोक्कातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने रत्नागिरी मध्ये जाऊन अटक केली. नरेद्रं दत्तात्रय मुळे रा. वैजापुर असे आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे गुन्हे शाखेने काल शनिवारी सहा वर्षांपासून फरार असलेल्या मोक्कातील आरोपीला अटक केली होती. त्यामुळे आता गुन्हे शाखा आणि स्थानिक गुन्हे शाखा आरोपींना आणण्याचा सामना रंगतो कि काय अशी चर्चा सुरु होती.

लक्ष्मण लिबांजी भगत वय २२ वर्षे यांनी २०१३ साली दरोड्याची तक्रार पैठण पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तेंव्हा स्थानिक गुन्हे शाखेने तपास करत लक्ष्मण बाबुराव गाडे वय २५ वर्षे रा. भिवंडी बोडखा जि. औरंगाबाद, चिमाजी दामोधर भोजने वय ३० वर्षे रा. शिरनेर ता. अंबड जि. जालना, शेख शकील शेख हासम वय ३० वर्षे रा. काजीगल्ली, वैजापुर जि. औरंगाबाद, ज्ञानेश्वर शंकर थोट वय ३५ वर्षे रा. नांदगाव ता. वैजापुर जि. औरंगाबाद, नकीम मंसुर सैय्यद वय २० वर्षे रा. भारडी ता. अंबड जि. जालना, रमेश दिनकर गव्हाणे वय २७ वर्षे रा. तिर्थापुरी ता. अबंड जि. जालना, रामदास गणपत बड़े वय ३० वर्ष रा. झालोरा ता. अबंड जि. जालना या सात जणांना अटक केली होती.

मात्र, नरेद्रं दत्तात्रय मुळे रा. वैजापुर हा १०१३ पासून फरार होता. तो रत्नागिरी मध्ये असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि फुंदे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पोउपनि राऊत यांच्यसह पथकाला रत्नागिरीला पाठविले. तिथे त्याचा दोन दिवस शोध घेत असताना तो सापडला नाही, मात्र तिसऱ्या दिवशी तो पोलिसाच्या गळाला लागला, राउत यांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले, नंतर त्याला पैठण पोलीस ठाण्यात हजर करून अटक करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!