🕒 1 min read
मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. वाझे यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर सचिन वाझेंकडून या प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
दरम्यान, ठाणे सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांचा अंतरिम जामीन नाकारला यामुळे सचिन वाझे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. आता याप्रकरणात पुढील सुनावणी १९ तारखेला होणार आहे. तर दुसरीकडं, एनआयए सचिन वाझे यांची कसून चौकशी करत होती. यामुळे सचिन वाझे यांचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
याप्रकरणी सचिन वाझे यांना आता अटक करण्यात आली आहे. रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. अटकेपूर्वी तब्बल १३ तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. सचिन वाझे काल सकाळी ११ वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरु होती. जवळपास १३ तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार सचिन वाजे यांनी शिवसेनेला मुकेश अंबानी कढून पैसे काढायचे होते असे स्पष्ट केलं. याचा अर्थ कि शिवसेना ह्या क्राईम मध्ये एक पार्टी आहे. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे तिथे सर्व सत्य बाहेर पडणार नाही म्हणून ताबडतोब राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रामध्ये लागू करावी.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 14, 2021
सचिन वाझे यांच्या अटकेनंतर भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. ‘मीडिया रिपोर्टनुसार सचिन वाजे यांनी शिवसेनेला मुकेश अंबानी यांच्याकडून पैसे काढायचे होते असे स्पष्ट केलं. याचा अर्थ कि शिवसेना या क्राईम मध्ये एक पार्टी आहे. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे तिथे सर्व सत्य बाहेर पडणार नाही म्हणून ताबडतोब राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रामध्ये लागू करावी’. अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- जिल्हा बँक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर परभणीतील काही मतदार सहलीवर रवाना
- पाच पैकी फक्त एका राज्यात भाजपची सत्ता येणार, शरद पवारांचे भाकीत
- रणबीर, भन्साळी पाठोपाठ मनोज बाजपेयी, आशिष विद्यार्थी, तारा सुतारिया कोरोना पॉझीटीव्ह
- ‘अशा मुख्यमंत्र्याला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा’, निलेश राणेंचा प्रहार
- ‘मोठा माणूस आणि त्याच्या षटकारांचे प्रेम प्रकरण’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
