मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. वाझे यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर सचिन वाझेंकडून या प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
दरम्यान, ठाणे सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांचा अंतरिम जामीन नाकारला यामुळे सचिन वाझे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. आता याप्रकरणात पुढील सुनावणी १९ तारखेला होणार आहे. तर दुसरीकडं, एनआयए सचिन वाझे यांची कसून चौकशी करत होती. यामुळे सचिन वाझे यांचे पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
याप्रकरणी सचिन वाझे यांना आता अटक करण्यात आली आहे. रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. अटकेपूर्वी तब्बल १३ तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. सचिन वाझे काल सकाळी ११ वाजताच एनआयएच्या कार्यालयात हजर झाले होते, तेव्हापासून त्यांची चौकशी सुरु होती. जवळपास १३ तासांच्या चौकशीअंती एनआयएने त्यांना अटक केली आहे.
वाझे लादेन आहे का म्हणणारे मुख्यमंत्री कुठे आहेत??? आतंगवाद्यांच्या वस्तू घेऊन जर पोलीस अधिकारी लोकांना ठार मारायला लागले आणि मुख्यमंत्री त्यांची बाजू घ्यायला लागले तर अशा मुख्यमंत्र्याला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 14, 2021
सचिन वाझे यांच्या अटकेनंतर भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ‘वाझे लादेन आहे का म्हणणारे मुख्यमंत्री कुठे आहेत ? आतंगवाद्यांच्या वस्तू घेऊन जर पोलीस अधिकारी लोकांना ठार मारायला लागले आणि मुख्यमंत्री त्यांची बाजू घ्यायला लागले तर अशा मुख्यमंत्र्याला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा’. असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पाठीवर थाप मारण्याचे कारण, पडेगावात तरुणाची हत्या
- मराठा आरक्षण सुनावणीपूर्वी छत्रपती संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- म्युझिक अल्बमच्या प्रमोशनसाठी प्रियांकाचा हॉट लूक, पहा फोटो
- अरे बघताय काय सामिल व्हा… मनसेने घातली तमाम मराठीजनांना साद !
- लोक तुमची प्रतिमा उद्ध्वस्त करू शकतात पण… , वाझेंच्या अटकेनंतर संजय राऊतांचं ट्विट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

