🕒 1 min read
औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांच्या निवडणुकीमध्ये शनिवारी अर्जांची छाननी करण्यात आली. या वेळी क आणि ड सोसायटीमधून आलेले तब्बल २४ अर्ज बाद झाले आहेत. या वेळी शेतकरी महासंघ पैठण मधून राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे तसेच खुलताबादहून किरण डोणगावकर हे बिनविरोध निवडून आले आहेत.
मुकेश बारहाते यांनी दिलेल्या माहितीनूसार १८ जागांसाठी ४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर रविवारी यांना चिन्हाचे वाटप देखील करण्यात येणार आहे. २१ मार्च ला मतदान होणार आहे. तर २२ मार्चला मतमोजणी करण्यात येणार आहेय तसेच आात्तापर्यंत च्या इतिहासात २१ जागा असायच्या दरम्यान वैयक्तिक अर्ज बाद झाले आहेत. या मध्ये बँकेचे संस्थापक सदस्य आता जिवंत देखील नाहीत. पणन प्रक्रिया मतदारसंघातून मंत्री अब्दुल सत्तार यांची बिनविरोध निवडून येण्याची स्थिती होती, परंतू आता शहनवाज खान तसेच प्रकाश मुथा यांच्याशी तगड मुकाबला होणार आहे, हे मात्र निश्चित समजल्या जात आहे.
शिवसेना – राष्ट्रवादी – भाजप एकत्र आल्याने गणित बदलतेय
शिवसेना आणि राष्ट्रवादी तसेच भारतीय जनता पार्टी सोबत घेतले आहे. तसेच शेतकरी संघर्ष पॅनल केल्यामुळे अनेक ठिकाणी अनपेक्षित बिनविरोध निवडून होणे देखील सुरु झाले आहे. तर काही ठिकाणी फुटलेली काँग्रेस देखील या निवडणुकीत मार खाते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आलिया भट्टची रणबीर कपुरच्या आठवणीत भावनिक पोस्ट
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
