नवी दिल्ली : भाजपचे माजी नेते आणि केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झाले आहेत. २०१८ साली त्यांनी भाप्मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी त्यांनी येत्या काळात कोणतेही राजकीय पद स्वीकारणार नाही असेही त्यांनी जाहीर केले होते मात्र आज सिन्हा यांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कोलकात्यात तृणमूल कॉंग्रेस (टीएमसी) च्या मुख्यालयात त्यांनी तृणमूलचा झेंडा खांद्यावर घेतला.
यावेळी डेरेक ओ ब्रायन, सुदीप बंडोपाध्याय आणि सुब्रत मुखर्जी उपस्थित होते. सिन्हा यांच्या पक्ष प्रवेशानंतर टीएमसीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी सिन्हा यांनी ते राजकारणात पुन्हा सक्रीय का झाले याबाबत माहिती दिली.सिन्हा म्हणाले की, देशातील सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. ममताजींवरील हल्ला झाल्यावर मला वाटलं की आता टीएमसीमध्ये प्रवेश करण्याची आणि ममता जी यांना पाठिंबा देण्याची वेळ आली आहे.
आज न्यायव्यवस्थेसह देशातील सर्व संस्था कमकुवत झाल्या आहेत.अटलजींच्या काळात भाजपाचा सर्वांची मते जाणून घेण्यावर विश्वास होता. पण आजचे सरकार जनतेला चिरडण्यात आणि राज्य करण्यावर विश्वास ठेवते. अकाली आणि बीजेडी यांनी भाजपची साथ सोडली आहे. आज भाजपबरोबर कोणीही उभे नाही. देशभरात ही एक गंभीर लढाई आहे. ही केवळ राजकीय लढाई नाही तर लोकशाही वाचवण्याचा हा लढा आहे म्हणूनच मी ममता दीदींची साथ देण्यासाठी राजकारणात पुन्हा सक्रीय झालो आहे असे ते म्हणाले.
यशवंत सिन्हा यांच्या पक्ष प्रवेशानंतर आनंद व्यक्त करताना सुब्रत मुखर्जी म्हणाले, की यशवंत सिंह आमच्यासोबत आल्याचा आम्हाला अभिमान आहे, षडयंत्र रचून ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये हल्ला झाला नसता तर त्या स्वतः आज हजर राहिल्या असत्या असे त्यांनी म्हटले.मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राम येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले असताना हा पक्ष प्रवेश तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवेल अशी शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कर्नाटकातून आलेला १३ लाखांचा गुटखा जप्त
- भाजपच्या विरोधात प्रचार करण्यासाठी राकेश टिकैत प.बंगालमध्ये पोहचले
- आरोपीसोबत मद्यपार्टी भोवली; सहायक उपनिरीक्षकासह दोघे निलंबित
- कोरोना तपासणी केंद्रात ‘रेटारेटी’ अन ‘दाटीवाटी’
- लॉकडाऊनच्या पाहणीसाठी तिनही उच्चपदस्थ अधिकारी रस्त्यावर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
