Share

महात्मा फुलेंच्या जीवनावर येणार चित्रपट; अजय-अतुल यांचे संगीत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : थोर समाजसेवक महात्मा जोतीराव फुले यांच्यावर काही दिवसापुर्वी एक मालिका आली होती. मात्र काही कारणास्तव ही मालिका मध्येच बंद करावी लागली. मात्र दिग्दर्शक समीर विद्वांस हे महात्मा जोतीराव आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट घेऊन येणार आहे. या चित्रपटाला संगीत मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे संगीतकार अजय-आतुल यांचे असणार आहे.

हा चित्रपट ‘क्रांतिसुर्य’ आणि ’क्रांतीज्योती’ दोन भागात प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग हा ‘क्रांतिसूर्य’ महात्मा जोतीराव यांच्या जीवनावर आधारित आसेल. तर ‘क्रांतीज्योती’ हा चित्रपट सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित आसेल. रणजित गुगळे आणि अनिश जोग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. अजय-अतुल ही मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज गायक जोडी या चित्रपटाचे संगीत करणार आहे.

https://www.instagram.com/p/CMO6RTkJ7Yk/

दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी याआधी धुराळा, डबल सीट, टाईम प्लीज आणि आनंदी गोपाळ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. निर्मात्यांनी या सिनेमाचे शीर्षक आणि व्हिडीओ प्रदर्शित करून सिनेमाची अधिकृत घोषणा केली आहे. या चित्रपटातील ज्योतीबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत कोणते कलाकार झळकणार हे अजून गुलदस्त्यात आहे. २०२२ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!