Share

परभणीमध्ये दारुच्या चोरट्या वाहतूकीसह रेतीचा टिप्पर पकडला

Published On: 

🕒 1 min read

परभणी :   शुक्रवारी रात्री विनापरवाना दारूची वाहतूक करणार्‍या अ‍ॅटोतून दारूचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त करुन एकास ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या वेळी स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार विश्वास खोले, फौजदार चंद्रकांत पवार यांच्यासह कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, शंकर गायकवाड, यशवंत वाघमारे, अजहर पटेल, दीपक मुदीराज, अरुण कांबळे गस्त घालत असताना त्यांना   एका अ‍ॅटोतून विनापरवाना दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून शुक्रवारी रात्री स्टेडीयमकडून वकीलकॉलनीकडे जाणारा  अ‍ॅटो (क्र.एमएच22 यु 3673) थांबवला. या नंतर पोलिसांनी ऑटो चालकाची चौकशी करुन अ‍ॅटोची तपासणी केल्यानंतर त्यात दारूचा साठा सापडला.

या कारवाईत 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन एकास ताब्यात घेतले. नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान शनिवारी पुर्णा येथे रेतीचे अवैध वाहतूक करणारे टिप्पर देखील स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. तर दोघे ताब्यात घेतले आहेत. तर या कारवाईमध्ये ६ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त करीत पूर्णा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!