🕒 1 min read
कोल्हापूर : पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक या दोन राज्यांमध्ये वाद चिघळला आहे. याचं कारण म्हणजे कानड्यांनी शुक्रवारी बेळगावात शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर हल्ला केला होता. यामुळे याचे पडसाद कोल्हापुरात उमटले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा गेल्या कित्येक दशकांपासून सुरु आहे.
सीमाभागातील मराठी बांधवांवर कानडी संघटना या वारंवार दबाव निर्माण करत असतात. त्यांचा मानसिक छळ तसेच संपत्तीचे नुकसान केल्याच्या देखील अनेक घटना समोर आल्या आहेत. शुक्रवारी झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी कोल्हापुरातील शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. कोल्हापुरात शिवसैनिकांनी कोल्हापूर बस स्थानकावर आंदोलन केले. यावेळी त्यांनी कर्नाटक राज्याची बससेवा बंद पाडली होती. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून शिवसेनेनं कन्नड रक्षक वेदिके या संघटनेला चोख प्रत्युत्तर दिलं होतं
दरम्यान, एका अज्ञात व्यक्तीने कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या असलेल्या महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक केली. हा प्रकार घडल्यानंतर उपस्थितांनी या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. त्याला सद्या पोलिसांनी ताब्यात घेतलं असून महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी बससेवा, तसेच कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी बससेवा बंद करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमधील वाद उफाळून आल्याचं दिसून येत असून सीमाभागात तणाव निर्माण होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- आलिया भट्टची रणबीर कपुरच्या आठवणीत भावनिक पोस्ट
- ‘लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री मंगळवारी संबोधित करणार’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- शहरातून पुन्हा तीन दुचाकी लांबवल्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
