Share

हिंगोलीकरांकडे पाणीपट्टीचे तब्बल साडे तीन कोटी थकित

Published On: 

🕒 1 min read

हिंगोली : मागील वर्षभरात हिंगोलीकरांनी तीन कोटी ३७ लाख रुपयांचे पाणीपट्टी थकवल्याची आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. मागील वर्षी लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे कर थकल्याचे बोलले जात आहे. ओपन हिंगोली नगर परिषदेला उशिरा सुचलेला शहाणपणामुळे यावेळी संपूर्ण कर भरण्याचे उद्दिष्ट पूर्ण होईल का? असा प्रश्न सध्या प्रशासनाला पडला आहे.

शहरात १२ हजार ७०४ नळधारक असून, त्यांनी नगर परिषदेचे तीन कोटी ३७ लाख ३० हजार ५६४ रुपये थकविले आहेत. नगर परिषदेने वसुलीसाठी तीन झोनची स्थापना केली असून, यासाठी पाच ते सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. वारंवार सूचना करूनही नळधारक पैसे भरत नसल्यामुळे हा बाकीचा आकडा फुगला आहे. नळाची बाकी ठेवण्यात शहरातील काही शासकीय कार्यालयेही मागे राहिले नाहीत.काही शासकीय कार्यालयांकडे नळपट्टीची ९६ लाख ७५ हजार ३७९ थाकबाकी राहिली असून, १९ लाख २ हजार ५३५ रुपये नगर परिषदेकडे जमा केले आहेत.

नगर परिषदेने वसुलीकरिता तीन झोन स्थापन केेले आहेत. पहिल्या झोनमध्ये ८२ लाख ४३ हजार ८७५ थकबाकी राहिली असून, ३८ लाख ४१ हजार ५७० रुपये वसूल केले आहेत. दुसऱ्या झोनमध्ये ९३ लाख ११ हजार ८१० थकबाकी राहिली असून, २८ लाख ६९ हजार ६४५ रुपये वसूल झाले आहेत, तर तिसऱ्या झोनमध्ये ६४ लाख ९९ हजार ५०० थकबाकी राहिली असून, २७ लाख ६१ हजार ६६५ रुपये वसूल झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!