🕒 1 min read
मुंबई: वाहन निर्मिती क्षेत्रात दररोज नवनवीन तंत्रज्ञान येत असतात. अद्यायावत तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या या वाहनांमध्ये जपानी वाहन निर्माती कंपनी होंडा देखील आघाडी वर असते. नुकतच होंडाची H’ness CB350 बाईक लाँच झाली होती. ही बाईक भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
नुकतीच कंपनीने नवी स्क्रॅम्ब्लर बाईक भारतात लाँच केली होती. या गाडीची किंमत 1.96 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी होती. कंपनीने या बाईकमध्ये स्मार्टफोन वॉईस कंट्रोल सिस्टिमही दिली आहे. याद्वारे तुम्ही ही बाईक तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट करु शकता. बाईक फोनशी कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये HSVCS मोबाईल अॅप डाऊनलोड करावं लागेल. त्यानंतर तुम्ही तुमच्या फोनद्वारे या बाईकमधील अनेक फीचर्स हाताळू शकता. मात्र या गाडीमध्ये दोष आढळल्याने कंपनी H’ness CB350 चे काही युनिट्स परत मागवणार आहे. जेणेकरुन काही फॉल्टी ट्रान्समिशन पार्ट दुरुस्त केले जाऊ शकतील अथवा बदलता येतील.
कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, गेल्या वर्षी 25 नोव्हेंबर ते 12 डिसेंबरदरम्यान बनवण्यात आलेले सर्व मॉडल्स कंपनी परत मागवणार आहे. होंडाने ट्रान्समिशनच्या चौथ्या गीयरच्या काउंटर शाफ्टमध्ये सेकंड मटेरियल ग्रेडचा वापर ओळखला आहे, जो बाईक बराच वेळ चालवल्यास बाइकचे नुकसान करू शकतो. मात्र, असे कोणतेही प्रकरण अद्याप समोर आले नसल्याचेही कंपनीने सांगितले आहे.
H’ness CB350 च्या या रिकॉल अभियानाची सुरुवात 23 मार्चपासून केली जाणार आहे. वॉरंटी असूनही सावधगिरी म्हणून कंपनी ही प्रक्रिया राबवत आहे. HMSI ने सांगितले आहे की, कंपनीचं हे स्वैच्छिक पाऊल आहे. केवळ ग्राहकांचा कंपनीवरील विश्वास कायम राहावा, या उद्देशांने कंपनीने हे पाऊल उचललं आहे. HMSI ने म्हटले आहे की, कंपनी शुक्रवारपासून वाहन तपासणीसाठी कॉल, ई-मेल, एसएमएसच्या माध्यमातून ग्राहकांना माहिती देईल. तथापि, किती बाईक परत मागवल्या जाणार आहेत हे कंपनीने अद्याप स्प्ष्ट केलेले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- आलिया भट्टची रणबीर कपुरच्या आठवणीत भावनिक पोस्ट
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
