लातूर : लातूरच्या रायवाडी येथे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा गावकऱ्यांनी वर्गणी काढून उभारला होता, परंतु प्रशासनाने कोणाचीही याबाबतीत एकही तक्रार नसताना हा पुतळा काढून टाकला. हा पुतळा पूर्ववत जागेवर बसवावा या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स मानव अधिकार मिशन यांच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलकांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
रायवाडी येथे सार्वजनिक वर्गणीतून २०१६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. स्थानिक पातळीवर सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करून ग्रामपंचायतीमार्फत नाहरकत प्रमाणपत्र मिळाले होते. पुतळ्याबाबत कोणा व्यक्ती अथवा संघटनेची तक्रार नसताना २५ फेब्रुवारी रोजी पुतळा काढण्यात आला. गावकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळ द्यावा, पुतळा काढू नये अशी विनंती केली.
परंतु, तहसीलदारांनी पुतळा काढण्यासाठी घाई केली. त्यांना कोणाचे आदेश होते, असे प्रश्न ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित केले जात आहेत. या प्रकाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे. नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर पुतळा ज्या जागेत होता, त्या ठिकाणी बसविण्यात यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आयुक्तांनी इतर रस्त्यांनींही जावे, म्हणजे त्यांचेही भाग्य उजळेल’
- वाईफमुळे त्रस्त असलेले जाधव म्हणतात ‘अ ब्युटीफुल लाईफ!’
- वडोदबाजार येथील आठवडी बाजार बंद
- परभणीत नागरी भागामध्ये शुक्रवारी मध्यरात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत संचारबंदी
- एसटी महामंडळाच्या बसेस आता गंगापूरलाही थांबणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
