🕒 1 min read
मुंबई : ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (AICTE) नवं धोरण जाहीर केलं असून त्यानुसार आता इंजिनिअर होण्यासाठी बारावीला गणित, फिजिक्स, केमिस्ट्री (PCM) हे विषय नसले तरी चालणार आहेत.
आता आपल्याला इंजिनिअर म्हणून करियर करायचं असेल तर बारावीला गणित, फिजिक्स, केमिस्ट्री (PCM) हे विषय नसले तरी चालणार आहेत. तशा प्रकारचं नवं धोरण ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (AICTE) जाहीर केलं आहे. त्यामुळे इंजिनिअर होण्यासाठी गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे विषय असणं गरजेचं नाही, हे विषय आता वैकल्पिक करण्यात आले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांसमोरचा मोठा अडथळा आता दूर झाला आहे.
ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (AICTE) 2021-22 या वर्षासाठी एक हॅन्डबुक जाहीर केलं आहे. त्यामध्ये इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेण्यासाठी बारावीला कोणते विषय आवश्यक आहेत त्याची माहिती दिली आहे. गणित, फिजिक्स, केमिस्ट्री, कॉम्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, बायोलॉजी, इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिस, बायोटेक्नॉलॉजी, कृषी, बिजनेस स्टडीज् आणि इंजिनियरिंग ग्राफिक्स या विषयांपैकी कोणतेही तीन विषय बारावीसाठी असतील तरीही आता इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळणार आहे.
आतापर्यंतच्या नियमानुसार इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा असेल तर बारावीला गणित, फिजिक्स, केमिस्ट्री (PCM) हे तीन विषय असणं बंधनकारक होतं. तो अडथळा आता ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या (AICTE) नव्या धोरणाने दूर झाला आहे.
- ‘आयुक्तांनी इतर रस्त्यांनींही जावे, म्हणजे त्यांचेही भाग्य उजळेल’
- विद्यार्थ्यांना अटक करणाऱ्या पोलिसांना अनिल बोंडे म्हणाले ‘तुम्ही तर सरकारचे कुत्रे’
- शिवसेनेच्या माजी खासदाराविरोधात शिवराळ भाषेत पोस्ट; अमोल कोल्हेंच्या भावावर गुन्हा दाखल
- ‘मुख्यमंत्र्यांसाठी मी आमदारकी पणाला लावली; आता संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा’
- #MPSC : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पो. नि. चोरमाले यांना तात्काळ निलंबित करा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
