मुंबई- राज्यभर चर्चा झालेल्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव पुढे आल्यानंतर तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मंत्रीपदाची मागणी केली आहे.
हरीभाऊ राठोड यांच्याकडे बंजारा समाजातील विदर्भातील प्रमुख नेत्यांपैकी एक म्हणून पाहिलं जातं. विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी विदर्भामध्ये शिवसेनेचा जोरदार प्रचार केला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या भागामध्ये लहान मोठ्या १४ प्रचार सभांचे आयोजन करण्यात आलं होतं.
हरिभाऊ राठोड यांनी सात मार्चला आणि 11 मार्चला अशी दोन पत्रं मुख्यमंत्र्यांना लिहली आहेत. बंजारा समाजाची सेनेला गरज आहे, मी आपली आमदारकी तुम्हाला मुख्यमंत्री बनवायला धोक्यात आणली असून मला काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्रीपद मिळालं असतं असं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.
शिवसेनेमध्ये बिनशर्त प्रवेश केल्याचं सांगत सत्तेत आल्यास खारीचा वाटा देऊ असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याची आठवणही हरिभाऊ राठोड यांनी करुन दिली आहे. आपण विधानसभेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेच्या आमदारांना निवडूण आणण्यासाठी काम केल्याचं सांगून आपला संपर्क आणि काम प्रत्येक जिल्ह्यात असल्याचा उल्लेख हरिभाऊ राठोड यांनी केलाय.
आपण भटक्या विमुक्त जाती, बारा बलुतेदार आणि ओबीसी समाजाचे नेतृत्व केल्यासं सांगत हरिभाऊंनी आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळाली तर त्याचा फायदा शिवसेनेला संपूर्ण राज्यात होईल असं सांगितलंय. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पोलीस उपनिरीक्षक असल्याचे भासवून वृद्धाची ७० हजारांची फवणूक
- अंशतः लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी कोरोना बाधितांचा आकडा हजारांच्या जवळ
- पार्सल घेतल्यानंतर ‘त्या’ महिलेने डिलीव्हरी बॉयसोबत केले ‘असे’ काही…पोलिसही चक्रावले
- पुण्यात लॉकडाऊन होणार का ? चंद्रकात पाटील यांनी घेतली अजित पवारांची भेट
- मराठा आरक्षणाच्या सद्यस्थितीवर अवलोकन बैठक घ्या-राजेंद्र दाते पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

