Share

शिवसेनेच्या माजी खासदाराविरोधात शिवराळ भाषेत पोस्ट; अमोल कोल्हेंच्या भावावर गुन्हा दाखल

Published On: 

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील बंधू सागर रामसिंग कोल्हे यांनी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्याबद्दल अत्यंत शिवराळ भाषेत आपल्या फेसबुक पेजवरून टीका टिप्पणी केली. आढळराव यांची सोशल मीडियावर होत असलेली ही बदनामी बुधवारी (ता. 10 मार्च) रात्री साडेनऊच्या सुमारास शिवसैनिकांच्या लक्षात आली. त्यानंतर ज्येष्ठ शिवसैनिक तथा मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार सागर कोल्हे यांच्या विरोधात मंचर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला राज्य सरकारकडून अर्थसंकल्पात नुकतीच मंजुरी दिली. त्यावरून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे मोठे बंधू यांच्या नावाने असलेल्या फेसबुक पेजवरून शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरून काही वादग्रस्त पोस्ट प्रसिद्ध करण्यात आल्या. याप्रकरणी सोशल मीडियावर आक्षेप नोंदविण्यात आले. त्यामुळे दत्ता गांजाळे यांनी सागर कोल्हे यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी कोल्हेविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

दत्ता गांजाळे म्हणाले, औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर नाव देण्यावरुन कोल्हे यांनी केवळ नामकरण केल्याने काय साध्य होणार आहे.अशी विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांना जनतेने ट्रोल केले होते. त्यातच पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाला राज्याची मंजुरी मिळाल्याने डॉ. कोल्हे यांनी श्रेयासाठी केलेल्या प्रयत्नांना सोशल मीडियावर लोकांनी जबरदस्त ट्रोल केले.

दरम्यान, खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आपल्या कुटुंबीयांवर संस्कार बिंबवायला का कमी पडले, हे त्यांनी जाहीर करावे. तसेच त्यांच्या बंधूंच्या या घाणेरड्या वर्तणुकीबद्दल माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांची जाहीर माफी मागावी; अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा गांजाळे यांनी यावेळी दिला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!