अमरावती- काल दिवसभर MPSC परीक्षा हा मुद्दा माध्यमाच्या केंद्रस्थानी होता.ही परीक्षा रद्द केल्यानं काल राज्यभरात निदर्शने करण्यात आली. अमरावतीतही आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. विद्यार्थ्यांना पोलिसांनी पकडून आणि विद्यार्थिनींना पुरुष पोलिसांनी व्हॅनमध्ये कोंबले.पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करून त्यांना ताब्यात घेतलं.
अमरावती येथे सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजप नेते अनिल बोंडे पोहोचले. या वेळी पोलीस आणि बोंडे यांच्यात खडाजंगी झाली. यावेळी पोलिसांची अमानुषता पाहून अनिल बोंडे संतप्त झाले. त्यानंतर पोलीस आणि बोंडेंमध्ये वाद झाला. त्या वेळी बोंडे यांनी पोलिसांना सरकारचे कुत्रे असं हिणवलंत्यानंतर पोलिसांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. हा व्हिडीओ अनिल बोंडे यांनी ट्विटरवरून शेअर केलाय.
सोबतच चोराप्रमाणे MPSC च्या विद्यार्थ्यांना आत मध्ये टाकलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पो. नि. चोरमाले यांना तात्काळ निलंबित करा व 14 तारखेलाच विद्यार्थ्यांची परीक्षा घ्या. अन्यथा राज्यसरकारने परिणामाला सामोरे जाण्यास तयार राहावे असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
https://twitter.com/DoctorAnilBonde/status/1370003576450396164?s=20
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी अनील बोंडे यांना ताब्यात घेतले. तर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन काही काळ सुरुच ठेवले. विद्यार्थ्यांनी अमरावती शहरातील गाडगेनगर चौक येथे चक्का जाम आंदोलन केले होते. या वेळी पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. तर काही ठिकाणी सौम्य लाठीमार करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राला तुमची गरज आहे, कृपया मास्क घाला;महापौरांची राज ठाकरेंना विनंती
- #MPSC : ‘तुमच्या विभागाने तुम्हालाच न विचारता निर्णय घेऊन तुम्ही किती ‘लायक’ आहात हे दाखवून दिले’
- शिवसेनेच्या माजी खासदाराविरोधात शिवराळ भाषेत पोस्ट; अमोल कोल्हेंच्या भावावर गुन्हा दाखल
- ‘मुख्यमंत्र्यांसाठी मी आमदारकी पणाला लावली; आता संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा’
- मोठी बातमी : पुण्यात लॉकडाऊन नाही, मात्र ‘हे’ कडक निर्बंध लागू होणार !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

