🕒 1 min read
अमरावती : कालचा संपूर्ण दिवस महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासातील अतिशय महत्वाचा दिवस ठरला आहे. १४ मार्च रोजी होणारी एमपीएससी कडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षाकाळ अचानक पुढे ढकलण्यात आली होती. यामुळे संतापाचा बांध फुटल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी काल दिवसभर रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले होते.
अमरावतीतही काल विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यावेळी माजी मंत्री व भाजपचे नेते अनिल बोंडे व पोलिस अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच शाब्दिक वादावादी झाली. बोंडे यांनी पोलिसांना ‘सरकारचे कुत्रे’ असे हिणवले. त्यावर पोलिसांनीही ‘तुम्हीही कुत्रेच आहात,’ असे प्रत्युत्तर बोंडे यांना दिले.
याचा व्हिडिओ बोंडे यांनी आपल्या ट्वीटरवरुन शेअर केला आहे. ‘आम्ही सरकारकडे मागणी करतो आहोत, तुमच्याकडे नाही असे’ सांगितल्यावर पोलिस अधिकारीही भडकले. ‘तुम्ही आंदोलन करता आणि आम्हाला नियंत्रण आणावे लागते. तुम्ही आम्हाला शहाणपण शिकवू नका,’ असे पोलिसांनी बोंडे यांना सुनावले. त्यावर पोरा-पोरींना आतमध्ये कोंडता, तुम्हाला समजत नाही का, अशी विचारणा बोंडे यांनी केली.
https://twitter.com/DoctorAnilBonde/status/1370003576450396164?s=20
त्यावेळी पोलिसांची आणि त्यांची बाचाबाची झाली. संतापलेल्या बोंडेंनी पोलिसांना सरकारचे कुत्रे असे हिणवले. त्यावर तुम्हीही कुत्रेच आहात, असे पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. संतापलेल्या पोलिसांनी नंतर बोंडेंना ताब्यात घेतले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द झाल्यानं अमरावती शहरातील अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अमरावती शहरातील गाडगेनगर चौक येथे काल चक्का जाम आंदोलन केले होते. तसेच सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी पोलीस बळाचा वापर केला. तसेच सौम्य लाठीचार्ज केला. त्यावेळी बोंडे व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. संबंदित पोलीस अधिकार्यला निल्माबित करण्यात उयव अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्याच्या जनतेला महाविकासआघाडी हा एक त्रास झाला आहे – नितेश राणे
- #MPSC : ‘तुमच्या विभागाने तुम्हालाच न विचारता निर्णय घेऊन तुम्ही किती ‘लायक’ आहात हे दाखवून दिले’
- शिवसेनेच्या माजी खासदाराविरोधात शिवराळ भाषेत पोस्ट; अमोल कोल्हेंच्या भावावर गुन्हा दाखल
- ‘मुख्यमंत्र्यांसाठी मी आमदारकी पणाला लावली; आता संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा’
- मोठी बातमी : पुण्यात लॉकडाऊन नाही, मात्र ‘हे’ कडक निर्बंध लागू होणार !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
