Share

मोठी बातमी : पुण्यात लॉकडाऊन नाही, मात्र ‘हे’ कडक निर्बंध लागू होणार !

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुण्यात कोरोनाचा विळखा अजूनच घट्ट होत आहे. पुणे शहरात गुरुवारी नव्याने १५०४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्याअगोदर बुधवारी पुण्यात १३२५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर मंगळवारी १०८६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

त्याच पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज कोरोना आढावा बैठक घेतली. . या बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त उपस्थितीत होते. आज झालेल्या बैठकीत पुण्यात लॉकडाऊन होणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण कडक निर्बंध घालण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश घेण्यात आले आहेत. तसेच उद्यानं एकवेळ बंद राहणार आहे. त्याशिवाय हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंतच सुरू राहणार आहे, असे निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आले आहेत.

तसेच लग्न सभारंभ आणि दशक्रिया विधीला 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी दिली जाणार नाही. पुणे शहरात रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार आहे. रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदी असणार आहे. पुण्यात लॉकडाऊन होण्याची भूमिका कोणाचीही नाही, असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले आहे.

या बैठकीदरम्यान पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोनाचा आढावा घेतला गेला. या ठिकाणी किती कोरोना रुग्ण आहेत, मृत्यू किती आहे? याचा आढावा घेतला गेला. सध्या पुण्यात 62 कंटेन्मेंट झोन आहेत. या झोनमध्ये कडक निर्बंध लावण्यात येणार आहे. पुणे पालिकेच्या विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक पार पडली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!