🕒 1 min read
मुंबई : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्या पासूनच देशातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्ष विरुद्ध ममता बॅनर्जी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. भाजपने ममतादीदींचं वर्चस्व संपवण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशी बलाढ्य फौज उतरवली आहे.
दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना केंद्राने ‘वाय प्लस’ व्हीआयपी सुरक्षा दिली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी बुधवारी दिली. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) यांनी ही सुरक्षा प्रदान केली आहे. या पथकाला विशेष सुरक्षा गट (एसएसजी) म्हणून ओळखले जाते. कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेगा रॅलीत मिथुन चक्रवर्ती हे 70 वर्षीय अभिनेते भाजपमध्ये दाखल झाले होते.
यावेळी त्यांनी ‘मी कोब्रा आहे. एकदा डसलो तर दंश केलेला माणूस पुन्हा उठत नाही’ असा इशारा तृणमूलसह अन्य पक्षांना दिला होता. चक्रवर्ती भाजपचे स्टार प्रचारक असल्याने यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा कव्हर देण्यात आले आहे आणि पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचार मोहिमेदरम्यान सशस्त्र सीआयएसएफ कमांडोही त्यांच्यासोबत असतील, अशी माहिती केंद्रातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
महत्त्वाच्या बातम्या :
- औरंगाबादेत कोरोनाचे ४२६ नवे रुग्ण, ५ रुग्णांचा मृत्यू, ११ मार्चपासून अंशत: लॉकडाऊन
- औरंगाबादेतील अंशत: लॉकडाऊनमध्ये काय सुरू, काय बंद? जाणून घ्या
- ‘नागरिकांनी लॉकडाऊन पुर्ण पणे लागू नये, यासाठी सहकार्य करावे’
- तर औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षांवर गुन्हा दाखल करू-जिल्हाधिकारी
- बाळासाहेबांच्या ‘त्या’ विधानाचा आधार घेत राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
