🕒 1 min read
नंदीग्राम : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या स्वत: नंदीग्राम मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. १० मार्च रोजी नंदीग्राम मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारी ममता बॅनर्जी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, आणि याच मतदारसंघात ममता जखमी झाल्या होत्या. सध्या त्यांच्यावर कोलकाताच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान नंदीग्राम विधानसभा मतदार संघ सर्वाधिक चर्चेत राहणार आहे. कारण, तृणमूलमधून भाजपात दाखल झालेल्या सुवेंदू अधिकारी विरुद्ध ममता बॅनर्जी असा थेट मुकाबला या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे.
याच मतदारसंघातून आज भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. यावेळी सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत केंद्रीय मंत्री स्मृती इरानी, बाबुल सुप्रियो हेदेखील उपस्थित राहणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याअगोदर आज सकाळीच सुवेंदू अधिकारी आज जानकीनाथ आणि सिंहवाहिनी मंदिरात पूजेसाठी उपस्थित झालेले दिसले. यावेळी होम-हवन कार्यक्रमातही ते सहभागी झाले.
२०१६ साली सुवेंदू अधिकारी याच मतदारसंघातून निवडून आले होते. सोबतच ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळात जागाही त्यांनी पटकावली होती. मात्र, डिसेंबर महिन्यात तृणमूलशी फारकत घेत सुवेंदू अधिकारी भाजपच्या गोटात सामील झाले होते. आपल्याला संधी मिळाली तर आपण ममता बॅनर्जी यांना ५० हजार मतांच्या फरकानं पछाडू, असा दावा सुवेंदू अधिकारी यांनी भाजपच्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांसमोर केला होता.
महत्वाच्या बातम्या
- पार्सल घेतल्यानंतर ‘त्या’ महिलेने डिलीव्हरी बॉयसोबत केले ‘असे’ काही…पोलिसही चक्रावले
- मोठी बातमी : आज रात्री ८ वाजेपासून ‘या’ जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन
- पाहिली सोडली अन् दुसरी पळवली, चोरट्यांचा ‘असाही’ प्रताप
- मिताली राजने रचला विक्रम ; 10,000 धावा करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू
- बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; बँकांचा सलग चार दिवस लॉकडाऊन…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
