Share

‘या’ कोविड सेंटरमध्ये दारु-चकना, सिगारेटचा कचरा, तक्रार करताच साफसफाई

Published On: 

औरंगाबाद : शहरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याने पालिकेची बंद केलेली कोविड केअर सेंटर्स पुन्हा सुरु झाली आहेत. यापैकी मनपाच्या किलेअर्क कोविड सेंटरमध्ये दारुच्या बाटल्या, चकना आणि सिगारेटची रिकामी पाकिटे, अस्वच्छता असल्याचे दिसून आले. याबद्दल आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार करताच १५ मिनिटात कारवाई होऊन सर्व कचरा हटवण्यात आला. कोरोना संसर्ग पुन्हा एकदा शहरात जोमाने पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर ११ मार्च गुरुवारपासून शहरात अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

मागील वर्षभराचा अनुभव पाहता मनपा प्रशासन कोविड सेंटरवरील व्यवस्थापनाबद्दल काळजी घेईल असे सांगितले होते. मात्र मुळ परिस्थीती वेगळी आहे. किलेअर्क कोविड सेंटरमधील इमारत क्रं ३ मध्ये पहिल्या मजल्यावर दारु्या रिकाम्या बाटल्यांचा खच, सिगारेटची पाकिटे, चकना दिसून आला. तसेच संपूर्ण खोलीत पसरलेला कचरा, अस्वच्छता होती. याबाबत चार दिवसांपूर्वी भरती झालेल्या एका २२ वर्षीय रुग्णाने आपल्या पत्रकार मित्रांच्या मदतीने मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांना फोटो व व्हिडिओ पाठवत तक्रार केली. या तक्रारीची तत्काळ दखल घेत सदर खोल्या स्वच्छ करण्यात आल्या.

रुग्णांच्या प्रतिक्रिया

येथील एका रुग्णाने ‘महाराष्ट्र देशा’शी बोलतांना सांगितले, अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर येथील स्वच्छतेचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आला मात्र येथे जास्त लक्षणे असलेल्या आणि लक्षणविरहित कुठल्याही प्रकारचा त्रास नसलेल्या रुग्णांना एकत्रच ठेवले जात आहे. त्यामुळे मनात धाकधूक आणि भिती निर्माण झाली आहे. त्रास नसतांना या रुग्णांमुळे त्रास वाढू शकतो. तसेच गरम पाण्याची सोय नसल्याने सर्दीचा त्रास होत आहे. जेवणाची गुणवत्ताही तितकी चांगली नाही. अशी तक्रार या रुग्णाने केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!