लातूर : जुना औसा रोड परिसरात लगसकर बिल्डिंगच्या समोर चार ते पाच मद्यधुंद तरुणांनी रात्री दहाच्या सुमारास रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांचे काच फोडल्या. या घटनेत एक युवक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस स्टेशन मधील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
जुना औसा रोड परिसरात काल दि.१० तारखेला रात्री १० वाजता अचानक मद्यधुंद चार ते पाच युवकांचा समूह तिथे गोळा झाला. काही क्षणांतच या युवकांनी आजूबाजूला उभे असलेल्या गाडयांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. या अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेत एका युवक जखमी झाल्याचे माहिती मिळाली आहे. ज्या युवकांनी गदारोळ केला ते स्वतः तेथील रहिवासी असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिसांनी लवकर धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे. या मद्यधुंद युवकांनी गाड्या का फोडल्या याची चौकशी पोलीस करत आहे. येणाऱ्या काळात अशी घटना न घडावी म्हणून पोलीस आणि नागरिकांनी प्रसंग सावधता बाळगायला हवी.
महत्वाच्या बातम्या
- सिनेमात नायकासोबत तितकाच खंदा खलनायकही लागतो, फडणवीस त्यांचे पात्र उत्तम वठवत आहेत’
- आ.नमिता मुंदडा यांच्या सासऱ्यांना पोलीस निरीक्षकांकडून अवमानकारक वागणूक
- अधिवेशनात गायब राहून मुख्यमंत्र्यांनी काय दिवे लावले हा सवाल विचारण्याची हिम्मत राऊत दाखवतील का?
- उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कारचा दरवाजा ढकलल्याने ममतांच्या पायाला दुखापत
- ‘भूतिया वेडिंग ऑफ द इअर,’ पाहा जान्हवीचा व्हिडिओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
