Share

हृदयद्रावक घटना! चिमुकल्याचा बादलीत पडून अंत

Published On: 

औरंगाबाद : काळाचा घात कधी कोणावर येईल याचा नेम नाही. अशीच एक हृदयद्रावक घटना शहरातील भुईवाड्यातील उदयकॉलनीत घडली. अंघोळ करण्यासाठी केलेल्या गरम पाण्याच्या बादलीत पडून चार वर्षीय चिमुकल्याचा आज बुधवारी अंत झाला. हि घटना १४ फेब्रुवारी घडली, जय संजय काळे असे चिमुकल्याचे नाव आहे.

बाथरूम मध्ये ठेवलेल्या गरम पाण्याचा अंदाज जय ला न आल्याने, त्या गरम पाण्याच्या बादलीत तो १४ फेब्रुवारी रोजी पडला. गरम पाण्याच्या बादलीत पडल्यामुळे त्याचे शरीर चांगलेच भाजले. हा प्रकार घरच्यांना कळताच त्याला घाटी रुग्णालयात नातेवाईक घेऊन आले.

घाटी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले. १४ फेब्रुवारी पासून त्याच्यावर उपचार सुरु होते. बुधवारी पाहटे त्याची अचानक तब्येत खालवल्याने आणि या घटनेत गंभीर भाजल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!