🕒 1 min read
नवी दिल्ली : गेल्या काही दशकांपासून पाकिस्तान भारताविरोधात दहशतवाद पोसत आला आहे. दररोज सीमेपलिकडून उखळी तोफा, गोळीबार ठरलेलाच. या दहशतवादामुळे अनेक भारतीय जवानही शहीद झाले आहेत. तरीही भारताने नेहमी पाकिस्तानला मदत केली आहे. आजही कोरोनाच्या संकटात भारताने पाकिस्तानला कोरोना लसीचे तब्बल १.६ कोटी डोस देण्याचा निर्णय घेतला आहे.
“GAVI करारांतर्गत भारतात निर्मिती करण्यात आलेली लस पाकिस्तानी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. भारत पाकिस्तानला ४.५ कोटी लसींचा पुरवठा करणार आहे. United GAVI alliance अंतर्गत भारताकडून हा लसींचा पुरवठा होणार असल्याचं राष्ट्रीय आरोग्य सेवा, नियमन आणि समन्वय फेडरल सेक्रेटरी आमीर अशरफ ख्वाजा यांनी सार्वजनिक लेखा समितीला सांगितलं आहे.
GAVI अंतर्गत लसींच्या पुरवठ्यासाठी हातमिळवणी करण्यात आलेली आहे. यामुळे जगातील अर्ध्याहून अधिक मुलांचं प्राणघातक आणि संसर्गजन्य रोगांविरोधात लसीकरण केलं जातं आहे. करोना संकटाच्या काळातही पाकिस्तानला ही मदत केली जात होती. सप्टेंबर २०२० मध्ये पाकिस्तानला करोना लस पुरवण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
विकसनशील आणि गरीब देशांना लस पुरवणं हा या कराराचा मुख्य हेतू आहे,” ख्वाजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, GAVI करारांतर्गत ४.५ कोटी लसीचे डोस मिळणार असून यामधील १.६ कोटी डोस हे जून महिन्यापर्यंत उपलब्ध होतील. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, समितीला माहिती देत असताना सिनेटर मुशहिद हुसैन सय्यद यांना लसीचे डोस कुठून येत आहेत यासंबंधी विचारणा करण्यात आली. यावेळी आरोग्य सचिवांनी पाकिस्तानला सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियामध्ये तयार होणारे लसीचे डोस मिळणार असल्याची माहिती दिली. कोरोना विषाणूच्या महासाथीपासून आपल्या देशातील नागरिकांचा बचाव करण्यासाठी अनेक देश मोठ्या प्रमाणात लसींची खरेदी करत आहेत. परंतु या उलट पाकिस्तान लसींची खरेदी करण्याऐवजी आंतरराष्ट्रीय डोनर्स आणि चीनसारख्या देशांवर लसीसाठी मोफत लसीसाठी अवलंबून आहे.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षण : संयम दाखवत असलेल्या मराठा समाजाला नेमकं कोण फसवत आहे ?
- हार्दिक-अश्विन नंतर आता महिला क्रिकेट टीम देखील थिरकली ‘या’ गाण्यावर
- मुंडे-देशमुखांचा याराना आजही कायम, विलासरावांच्या पुतळ्याशेजारी उभारणार गोपीनाथरावांचा पुतळा !
- भारतातील कृषी सुधारणांबाबत ब्रिटिश संसदेतील चर्चेबाबत भारताची नाराजी
- विनामास्क धारकांना धडा शिकवण्यासाठी आता ‘पोलीसांना’ दंड वसूलीचे अधिकार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

