🕒 1 min read
देहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांच्या कामाच्या शैलीबाबत सत्तारूढ भाजप आमदारांमध्ये असलेल्या तीव्र नाराजीला तोंड फुटल्यावर त्यांना बदलण्याच्या हालचाली गतिमान झाल्या होत्या. अखेर उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी राज्यपाल बेबी रानी मोर्या यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे.
आता उत्तराखंडची धुरा कुणाकडे जाणार याचा पेच कायम आहे, मात्र बुधवारी भाजप नव्या मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर करेल असं कळतंय. उद्या भाजपची यासंदर्भात बैठकही होणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आता दुसऱ्याला मिळायला हवी, असं पक्षाचं मत आहे. मी या पदावर कधी विराजमान होईन, याचा मी विचारही केला नव्हता.
मात्र भारतीय जनता पक्षाने मला ही संधी दिली. असं केवळ भाजपमध्येच होऊ शकतं, अशी प्रतिक्रिया त्रिवेंद्र सिंह रावत यांनी दिली आहे. त्यामुळे आता रावत यांच्या राजीनाम्यामुळे भाजपचा उत्तराखंडमधील नवा चेहरा कोण असणार? याबाबत चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, बुधवारी नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- खा.जलील यांच्या कार्यालयामागील इमारत जमीनदोस्त
- महाविकास आघाडीकडून मराठवाड्यावर अन्याय-आ. मेघना बोर्डीकर
- सौदीच्या तेल विहिरींवर हल्ले, पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकणार
- अधिवेशन एक दिवसाने वाढवा; विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसचं ठरलंय !
- अमिताभ बच्चन यांनी केला मराठी चित्रपटाचा टीझर शेअर

