🕒 1 min read
अहमदाबाद : अहमदाबाद येथे भारत-इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला एक डाव आणि २५ धावांनी हरवलं आहे. तर हा सामना जिंकून भारताने मालिका देखील ३-१ ने आपल्या खिशात घातली आहे. याबरोबरच भारताचे जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंड विरुद्ध इंग्लड मध्ये लॉर्ड्सवर होणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 ते 22 जूनमध्ये ही फायनल खेळवली जाईल. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात ही मॅच नियोजित आहे, पण आता या ठिकाणाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे खेळाडूंची सुरक्षा बघता आयसीसी फायनलचं ठिकाण बदलू शकतं.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार लॉर्ड्सवरच्या फायनलबाबत विचार केला जात असल्याचं आयसीसीच्या सूत्रांनी सांगितलं. ‘ठिकाणाची लवकरच घोषणा केली जाईल. आयसीसीचं प्लानिंग लॉर्ड्स नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि त्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडून आयसीसी सल्ला घेईल. इंग्लंडने मागच्या वर्षी जसा बायो-बबल बनवला होता, तसा यावेळीही बनवला जाऊ शकतो,’ असं आयसीसीच्या अधिकाऱ्याने सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- ‘इंग्लंड अहमदाबादमध्ये हरला नाही तर…’; सेहवागने ट्विट करून केले भारतीय संघांचे अभिनंदन
- ‘रिषभचं वजन कमी केलं आणि…’, शास्त्री यांचा मोठा गौप्यस्फोट
- संशोधनासाठी तरतूदीची रक्कम तीनपटीने वाढली; विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेत मंजुरी
- क्रिकेट क्षेत्रातनंतर धोनीची शेतीमध्ये धुव्वादार बॅटींग ; ‘सर्वश्रेष्ठ गोपालक’ पुरस्काराने गौरव
- ‘मॅन ऑफ द मॅच’ ऋषभ पंतने मागितली माफी, म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
