🕒 1 min read
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या ज्वलंत हिंदुत्वाची तोफ म्हणून ज्यांची ओळख होती असे माजी आमदार दिवंगत अनिल राठोड यांचे काही महिन्यांपुर्वी निधन झाले आहे. मात्र त्यांच्या निधनानंतर हयात असताना राठोड यांचे कट्टर राजकीय विरोधक असणारे माजी खासदार आणि भाजप नेते दिलीप गांधी यांच्या मुलाने अनिल भय्यांना श्रद्धांजली म्हणून अनिल राठोड यांचे चिरंजीव विक्रम राठोड यांच्या विरोधात महापालिका पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार देऊ नये अशी मागणी केली आहे. सुवेंद्र गांधी यांनी भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांच्याकडे ही मागणी केली आहे.
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये ही पोटनिवडणूक होत आहे. तेथून अपक्ष म्हणून आलेल्या छिंदमला अपात्र ठरवून ते पद रद्द केले. त्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. महापालिकेच्या एका कर्मचाऱ्यासोबत बोलताना छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यावेळी तो भाजपमध्ये होता. नंतर भाजपने त्याला बडतर्फ केले होते. शिवसेनेने या विषयावरून भाजपला टार्गेट केले होते. त्यानंतर छिंदम पुन्हा या प्रभागातून अपक्ष म्हणून निवडून आला होता. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला अपात्र ठरविल्याने तेथे पोटनिवडणूक होत आहे.
या पार्श्वभूमीवर गांधी यांनी पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांच्याकडे केलेली मागणी लक्षवेधक ठरत आहे. गांधी यांनी म्हटले आहे की, ‘ही पोटनिवडणूक भाजपने न लढविण्याचा निर्णय घ्यावा. तेथून दिवंगत राठोड यांचे चिरंजीव विक्रम यांना पाठिंबा द्यावा. गेल्या ४० ते ५० वर्षांपासून राठोड यांनी हिंदुत्वाचा झेंडा हाती घेत शहरात काम केले होते. त्यांचा राजकीय प्रवास खूप खडतर होता. सर्वसामान्य नागरिकांसाठी ते आयुष्यभर लढले. त्यांच्या अकाली निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मोठा निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यासाठी माझी ही वैयक्तिक मागणी आहे. माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी व राठोड यांना कोणताही राजकीय वारसा नसतांना स्वतःच्या कर्तृत्वावर शून्यातून विश्व निर्माण केले. दोघांचा राजकीय प्रवास बरोबर सुरु झाला. गांधी व राठोड यांच्यात गेल्या काही वर्षांपासून ताणतणाव व राजकीय वाद होता. तरीही सुमारे २५ – ३० वर्षे दोघांनी भाजपा-सेना युतीत बरोबर काम केले होते. दोघांनीही एकमेकांच्या निवडणुकीत सहकार्य केलेले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्व. राठोड हे जवळचे स्नेही होते. प्रभाग ९ मध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने उमेदवार न देता विक्रम राठोड यांना पाठींबा द्यावा, अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कडेही करणार आहे,’ असेही गांधी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज ठाकरेंचा पुन्हा ‘विनामास्कचा आग्रह’, माजी महापौरांना काढायला लावला मास्क
- गौहर खान वरती कोसळला दुःखाचा डोंगर ; वडिलांचे निधन
- जातीचं आरक्षण देणं केंद्राचा विषय नाही, हा राज्याचा विषय – चंद्रकांत पाटील
- ‘शिवसेनेचा इतर राज्यात १ आमदार काय १ नगरसेवक पण कधी निवडून आला नाही पण ते सांगणार कसं?’
- जगातील एकाही ओपनरला आतापर्यंत जमला नाही ‘तो’ विक्रम रोहीतच्या नावे !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
