🕒 1 min read
नाशिक : राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गर्दी टाळणं आणि मास्कचा वापर करणं हाच करोनापासून दूर राहण्याचा उत्तम उपाय असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे मास्क न घालताच मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. त्याबद्दल विचारलं असता त्यांनी अजब उत्तर दिलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळं उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे. महापालिका प्रशासन राज ठाकरे यांच्यावर काय कारवाई करणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
मराठी भाषा दिनानिमित्त मनसेनं शाखा-शाखांवर ‘मराठीतून स्वाक्षरी’ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यापैकी एका कार्यक्रमात राज ठाकरे स्वत: सहभागी झाले होते. मात्र, त्यांनी मास्क लावले नव्हते. याबद्दल पत्रकारांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावर, मी मास्क घालतच नाही. तुम्हालाही सांगतो,’ असं ते म्हणाले. राज यांच्या या वक्तव्यामुळं चर्चा रंगली आहे.
राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरे यांचे विनामास्क नाशकात आगमन झाले. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी माजी महापौर अशोक मुर्तडक आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी मुर्तडक यांना “मास्क काढ” असा सूचक इशारा केला. त्यामुळे राज ठाकरेंच्या पुन्हा ‘विनामास्क आग्रहा’ची चर्चा रंगली आहे. नाशिकमध्ये विनामास्क नागरिकांना 1000 रुपये दंड केला जातो. त्यामुळे नाशिक महापालिका आणि पोलीस आता राज ठाकरे आणि माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्यावर कारवाई करणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या याच ‘विनामास्क आग्रह’चा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच समाचार घेतला आहे. ‘काही लोक तर सरळ म्हणतात मी मास्क घालणार नाही. अरं बाबा… तुला काही कोरोना होणार नाही. पण तुझ्यामुळे दुसऱ्याला होईल त्याचं काय ?’ अस म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
- जातीचं आरक्षण देणं केंद्राचा विषय नाही, हा राज्याचा विषय – चंद्रकांत पाटील
- ‘शिवसेनेचा इतर राज्यात १ आमदार काय १ नगरसेवक पण कधी निवडून आला नाही पण ते सांगणार कसं?’
- जगातील एकाही ओपनरला आतापर्यंत जमला नाही ‘तो’ विक्रम रोहीतच्या नावे !
- बाहेरील देशांना कोरोना लस पुरवठा; सरकारसह भारत बायोटेक आणि सिरमला न्यायालयाची नोटीस
- ‘अरं बाबा… तुला काही कोरोना होणार नाही, पण तुझ्यामुळे दुसऱ्याला होईल त्याचं काय ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
