Share

जगातील एकाही ओपनरला आतापर्यंत जमला नाही ‘तो’ विक्रम रोहीतच्या नावे !

Published On: 

अहमदाबाद : अहमदाबाद येथे पार पडलेल्या डे-नाईट कसोटीत इंग्लंडच्या संघाला दोन दिवसांच्या आतच पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंनी या पराभवाचे खापर खेळपट्टीवर फोडले. मात्र गुरुवारपासून अहमदाबादमध्येच सुरू झालेल्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंपून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 205 धावांमध्येच आटोपला. अहमदाबादमधील ठणठणीत खेळपट्टीवर जो रूटचा संघ गडगडला.

इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांवर गुंडाळल्यानंतर टीम इंडियानं सावध खेळ केला आहे. शुबमन गिल पहिल्याच षटकात माघारी परतल्यानंतर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. पण, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अवघ्या १६ धावांची भर घातल्यानंतर पुजारा ( १७) बाद झाला. दरम्यान, रोहितनं खिंड लढवताना मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत १००० धावा करणाऱ्या पहिल्या सलामीवीराचा मान रोहितनं पटकावला. शिवाय अजिंक्य रहाणेनंतर WTCमध्ये १००० धावा करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला.जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे सलामीवीररोहित शर्मा – १०००* डेव्हिड वॉर्नर – ९४८ डिन एल्गर – ८४८ डॉम सिब्ली – ८४१ मयांक अग्रवाल – ८१०.

अजिंक्य रहाणेनं ( १०६८) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना WTCमध्ये १००० धावा करणाऱ्या पहिल्या भारतीय फलंदाजाचा मान पटकावला होता. मार्नस लाबुशेन ( १६७५), जो रूट ( १६३०), स्टीव्ह स्मिथ ( १३४१), बेन स्टोक्स ( १३३२) हे फलंदाज आघाडीवर आहेत सलामीवीर म्हणून सर्वात जलद १००० धावा करणारे फलंदाज हर्बर्ट शटक्लिफ – १३ डाव लेन हटन – १६ डाव रोहित शर्मा – १७ डाव ग्रॅमी स्मिथ – १७ डाव तीनही फॉरमॅटमध्ये १००० धावा करणारे भारतीय शिखर धवन आणि रोहित शर्मा आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!