🕒 1 min read
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री गौहर खान हिच्यावर आज दु:खाचा डोंगर कोसळला. दीर्घकाळापासून आजारी असलेल्या तिच्या वडिलांचे आज निधन झाले. गेल्या गौहरचे वडील अनेक दिवसांपासून रूग्णालयात भरती होते. आज सकाळी त्यांनी अंतिम श्वास घेतला. गौहरची मैत्रिण प्रीती सिमोस हिने सोशल मीडिया पोस्टद्वारे गौहरच्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे.
प्रीतीने गौहरच्या वडिलांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘माझ्या गौहरचे वडील, ज्यांच्यावर माझे प्रचंड पे्रम होते. ते अभिमानाने जगले,’ असे हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले. गौहर वडिलांची प्रचंड लाडकी होती. गौहरच्या लग्नानंतर काहीच दिवसांत त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले होते. लग्नानंतर गौहरने वडिलांसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला होता. वडिल आजारी असल्यामुळे गौहर प्रचंड तणावाखाली होती. घर आणि काम मॅनेज करणे तिच्यासाठी कठीण होत होते. पण तरिही पित्याच्या सेवेत तिने स्वत:ला वाहून घेतले होते.
https://www.instagram.com/p/CL9R1mmnp0E/?utm_source=ig_web_copy_link
बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल गौहर खान सलमान खानचा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिएलिटी शो ‘बिग बॉस’च्या 7 व्या सीझनची विजेती होती. तिने बॉलिवूडमध्ये इश्काजादे या चित्रपटातून परिणीती अर्जुन कपूर सोबत पदार्पण केले होते. नंतर विद्या बालनच्या ‘ बेगम जान’ या चित्रपटात ती दिसली होती. या चित्रपटात तिने रुबीनाची भूमिका साकारली होती.
महत्वाच्या बातम्या
- …म्हणून मराठवाड्यात सर्वच कोविड सेंटरवर महिला सुरक्षा रक्षकांच्या नेमणूकीचा निर्णय
- आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार; आंदोलकांचा पवित्रा
- गॅस दरवाढीचा निषेध; महिलांनी पंतप्रधान मोदींना पाठवल्या गोवऱ्या
- कोरोनाचा धोका वाढला : औरंगाबादेत सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या तिनशेपार
- कोरोनामुळे यंदा वेरूळ येथील महाशिवरात्रीची यात्रा रद्द, भाविकांनी घरूनच घेण्याचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
