🕒 1 min read
लातूर : जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील शिरुर ताजबंद थोरले वाडी परिसरातील पाच शेतकऱ्यांच्या उसाला शॉटसर्किटमुळे आग लागली. बुधवारी दुपारी २ च्या सुमारास लागलेल्या या आगीत एकूण पाच शेतकऱ्यांचा ऊस व दोन शेतकऱ्यांचे पाईप, ठिबकंसिंचनाच्या नळ्या जळून खाक झाल्या. या भरउन्हात ही आग लागील आसल्याने रौद्ररुप धारण केले होते. यामुळे परिसरात भितीचे वातवरण निर्माण झाले होते.
परिसरातील नागरिकांनी तात्काळ अहमदपूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला संपर्क केला. काही वेळातच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळावर दाखल झाली आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली. मात्र तोपर्यत शेजारी असलेल्या दैवशाला अशोक फुलमंटे व बालाजी दिलीप वलसे या दोन शेतकऱ्याचे शेतीचे साहित्य व पाईप जळुन खाक झाले होते. यावेळी शिरुर ताजबंद चे तलाठी नवनीत जामनिक यांनी पंचनामा केला.
शॉटसर्किटमुळे लागलेल्या या आगीत सुधाकर फुलमंटे एक हेक्टर, सचिन वलसे १.४० हेक्टर, पद्मीनबाई वाढवणकर १.२० हेक्टर, अरंविद फुलमंटे १.४८ हेक्टर व गोंविद वलसे ०.३२ हेक्टर अशा एकूण पाच शेतक-यांचा ऊस जळून खाक झाला. वलसे आणि फुलमंटे यांच्या शेतीतून वीज वितरण कंपनीच्या तारा गेलेल्या असल्यामुळे आग लागली असावी असे स्थानिकांचे म्हणणे आहे. काही दिवसांतच हा ऊस साखर कारखान्याला जाणार होता आणि शेतक-यांनी वर्षेभर केलेल्या मेहनतीचे फळ त्यांना मिळणार होते परंतु या आशेवर पाणी फिरले आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- “कोणीतरी खूप चिडलंय”, पंतने इंग्लंडच्या फलंदाजाला डिवचलं अन्…
- स्वातंत्र्याच्या मानांकनामध्ये भारताचे स्थान घसरले
- कपिल शर्माची मुलगी अनायराचा क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय ट्रेंड
- ‘भाजपाला बंगालमध्ये १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्यास पॉलीटिकल स्ट्रॅटेजीस्ट म्हणून काम सोडून देईल’
- गायिका श्रेया घोषालकडे ‘गुडन्यूज’ ; सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली आनंदाची बातमी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
