🕒 1 min read
अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामना आजपासून (०४ मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू झाला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाहुणा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरला आहे. परंतु भारतीय गोलंदाजांनी त्यांचा निर्णय चुकीचा ठरवत एका-नंतर-एक विकेट्स काढल्या. त्यातही युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने इंग्लंडचा कर्णधार जो रुटच्या रुपात संघाला मोठी विकेट मिळवून दिली.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडचे आघाडीचे फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरले आहेत. अक्षर पटेलने इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना तंबूत धाडत भारताला जबरदस्त सुरुवात करुन दिली. पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर अक्षरने इंग्लंडचा सलामीवीर डॉमिनिक सिब्ले याला त्रिफळाचीत केलं. तो फक्त दोन धावा करु शकलाय यानंतर सिब्लेच्या पाठोपाठ दुसरा सलामीवीर जॅक क्रॉले यालाही अक्षरने मोहम्मद सिराजच्या हाती झेल द्यायला भाग पाडलं. अक्षरला मिळालेल्या या दुसऱ्या विकेटमध्ये ऋषभ पंतचाही वाटा होता.
https://twitter.com/teamindia2_0/status/1367338676099837952?s=20
आठव्या ओव्हरमध्ये क्रॉले चौकार मारण्यासाठी पुढे आला होता. यानंतर ऋषभ पंतने कोणीतरी खूप चिडलंय म्हणत क्रॉलेला चिडवण्यास सुरुवात केली. पुढच्याच चेंडूवर क्रॉलेने पुन्हा एकदा पुढे जाऊन फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा अंदाज चुकला आणि चेंडू थेट मोहम्मद सिराजच्या हातात देऊन झेलबाद झाला.
महत्वाच्या बातम्या
- ‘सत्ताकारणात ‘ज्यांच्या हाती ससा तो पारधी’ तरी ‘पारध्याला वाटेल त्याची पारध’ असा अर्थ होत नाही’
- चौथ्या कसोटीत नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने ; बुमराहच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी
- पोलार्डचा धमाका एकाच षटकात लगावले ६ उत्तुंग षटकार; धनंजय ची हॅटट्रीक
- अग्गबाई, वर एक आणि वधू दोन! बुमराहची खरी वधूराणी कोण? दोघींचे नाव चर्चेत
- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी घेतली लस; सर्व ज्येष्ठांनी लस घेण्याचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
