Share

गायिका श्रेया घोषालकडे ‘गुडन्यूज’ ; सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली आनंदाची बातमी!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा नंतर आता बॉलीवूड मधील गोड गळ्याची गायिका श्रेया घोषाल लवकरच आई बनणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रेयाने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. कोरोना काळात सध्या मनोरंजन विश्वातून अशाच खूप चांगल्या बातम्या येत आहेत. करीना देखील दुसऱ्यांदा आई झाली.

श्रेयाने ट्वीट करून लिहिले की, ‘बेबी श्रेयादित्य येत आहे. ही बातमी तुमच्यासोबत शेअर करताना मला आणि शीलादित्यला खूप आनंद होत आहे. तुमच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू झाल्यामुळे आपणा सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादांची आम्हाला गरज आहे.’ श्रेयाने 2015मध्ये शिलादित्य मुखोपाध्यायशी लग्न केले होते.

लॉकडाऊन दरम्यान श्रेयाचे ‘आंगना मोरे’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. श्रेयाने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, जेव्हा लॉकडाऊन दरम्यान ती खूप कंटाळली होती, तेव्हा तिला या गाण्याची कल्पना सुचली. ती म्हणते की, हा वाईट काळ सगळ्यांसाठीच निराशाजनक होता. सगळेच जण यातून बाहेर पडण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत होते. मात्र, या वाईट काळातही आमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव झाला, असे श्रेया म्हणाली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!