नवी दिल्ली: जगभरातील देशांमध्ये नागरिकांना दिल्या जाणाऱ्या स्वातंत्र्याचे मुल्यांकन करणारी संस्था फ्रीडम हाऊस हिने नुकताच एक अहवाल सादर केला यामध्ये त्यांनी भारताचे मानांकन घसरल्याच नमूद केल आहे.
नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून भारताचं स्वातंत्र्य नष्ट होत असल्याचं फ्रीडम हाऊसने त्यांच्या अहवालात म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे मानांकन 71 वरून घसरुन 67 करण्यात आले आहे. जागतिक पातळीवरील 211 देशांपैकी भारताचा क्रमांक 88 वा लागतो. यापूर्वी भारत 83 व्या क्रमांकावर होता.
जागतिक पातळीवर नॉर्वे, स्वीडन, फिनलंड हे देश 100 पैकी 100 गुण मिळवून पहिल्या स्थानावर आहेत. तसेच या यादीत सर्वात खाली तिबेट आणि सिरियाचा समावेश करण्यात आला आहे. फ्रीडम हाऊस दरवेळी आपल्या अहवालात काश्मीरचा उल्लेख भारतापेक्षा वेगळा करते. यावेळी काश्मीरला स्वातंत्र्यच नाही असं त्यांच्या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे भारत पूर्णतः स्वतंत्र देशावरून आता भारत अंशतः स्वतंत्र देशावर खाली आला आहे. 2013 ते 2019 या काळात काश्मीर हा भाग अंशतः स्वतंत्र या प्रवर्गात येत होता. देशद्रोहाच्या कायद्याचा वापर, मुस्लिम अत्याचार आणि कोरोनासारखी परिस्थिती हाताळताना उचललेले पाऊल या पार्श्वभूमीवर भारताचे मानांकन कमी करण्यात आल्याचं फ्रीडम हाऊसच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सत्ताकारणात ‘ज्यांच्या हाती ससा तो पारधी’ तरी ‘पारध्याला वाटेल त्याची पारध’ असा अर्थ होत नाही’
- चौथ्या कसोटीत नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने ; बुमराहच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी
- पोलार्डचा धमाका एकाच षटकात लगावले ६ उत्तुंग षटकार; धनंजय ची हॅटट्रीक
- अग्गबाई, वर एक आणि वधू दोन! बुमराहची खरी वधूराणी कोण? दोघींचे नाव चर्चेत
- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी घेतली लस; सर्व ज्येष्ठांनी लस घेण्याचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
