Share

‘भाजपाला बंगालमध्ये १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्यास पॉलीटिकल स्ट्रॅटेजीस्ट म्हणून काम सोडून देईल’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचे (TMC) सरकार आहे.पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्या पासूनच देशातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्ष विरुद्ध ममता बॅनर्जी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे.

भाजपने ममतादीदींचं वर्चस्व संपवण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशी बलाढ्य फौज उतरवली आहे.

गेल्या 10 वर्षांपासून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. या सत्तेला भाजपनं मोठं आव्हान निर्माण केलं असतानाच असदुद्दीन ओवेसी यांच्या MIM पक्षानं निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं ठरवलं. त्यामुळे ममता बॅनर्जींसमोरील आव्हान आणखीच तीव्र झालं आहे.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर पॉलीटिकल स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम सोडून देईल, असे आव्हान प्रसिद्ध रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रशांत किशोर म्हणाले,भाजपाला शंभरपेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी हे काम सोडून देईल. आयपॅक ही संस्थाही सोडून देईल आणि अगदी वेगळे काहीतरी काम करेल. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत आमचा पराभव झाला होता. परंतु, तेथे आम्हाला जे करायचे होते ते करू शकलो नव्हतो. परंतु, पश्चिम बंगालमध्ये ममतादिदींनी आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे जर पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला तर मी या कामाला योग्यच नाही असा अर्थ होईल.

प्रशांत किशोर म्हणाले,विरोधातील अनेक नेत्यांना भाजप पक्षात घेते हि त्या पक्षाची ही रणनितीच आहे. ते दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांची अक्षरश: शिकार करतात. त्यांना पैशाचे, पदांचे आमिष दाखविले जाते. उमेदवारी दिली जाते. त्यामुळे तृणमूल कॉँग्रेसमधीलही अनेक नेते त्यांच्याकडे गेले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!