🕒 1 min read
मुंबई : ‘नेहमीप्रमाणे उद्धवनी सभागृहात फूटपाथवरचा चणेवाला जसा बोलतो तसं भाषण केले. या माणसाची लायकी ग्रामपंचायतीमध्ये बोलण्या इतकी पण नाही पण दुर्देव म्हणावं महाराष्ट्राचे की महाराष्ट्राच्या जनतेला अशा बिनडोक व्यक्तीला सहन करावं लागत आहे.’ अशी घणाघाती टीका भाजपचे नेते निलेश राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्यावर केली आहे.
नेहमीप्रमाणे उद्धवनी सभागृहात फूटपाथवरचा चणेवाला जसा बोलतो तसं भाषण केले. या माणसाची लायकी ग्रामपंचायतीमध्ये बोलण्या इतकी पण नाही पण दुर्देव म्हणावं महाराष्ट्राचे की महाराष्ट्राच्या जनतेला अशा बिन्डोक व्यक्तीला सहन करावं लागत आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 3, 2021
१ मार्च पासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरु झाले आहे. अधिवेशन सुरु झाल्यापासून म्हणजेच अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी अनेक प्रकारच्या टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर केल्या होत्या.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना चौकातलं भाषण आणि विधानसभेतील भाषण यातला फरक समजला नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर केला. मुख्यमंत्र्यांनी भारतीय सैनिकांचा अपमान केलाय. देशाच्या शूर सैनिकांचा घोर अपमान मुख्यमंत्र्यांनी केला. अमित शाह यांच्या जे बोलले ते उसणं आवसान आणून, खोट बोल पण रेटून बोल, असं मुख्यमंत्र्यांच रुप पाहायला मिळालं. अस फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान यावेळी काही सदस्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचा एकरी उल्लेख केला यामुळे ठाकरे यांनी त्याचं भाषण काही काळ थांबवल होत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली, ‘उद्धव ठाकरे हे विशिष्ट पक्षाचे जरी असले तरी ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री पद हे सन्मानीय पद आहे यामुळे जर कोणी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.’ असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना कोणालाच ओळखत नाही, त्याची थट्टा करू नका – उद्धव ठाकरे
- ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना चौकातलं भाषण आणि विधानसभेतील भाषण यातला फरक समजला नाही’
- ‘आम्ही औरंगाबादचं संभाजीनगर करणारच, पण तुम्ही सावरकरांना भारतरत्न का देत नाहीत?’
- विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा होऊ देणार नाही; ठाकरेंनी भाजपला ठणकावलं
- महिला न्यायाधीशाला मध्यरात्री वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे वकिलाला पडले महागात; थेट तुरुंगात झाली रवानगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
